रोहित, विराट घेणार टी-ट्वेंटीमधून निवृत्ती? Ravi Shastri यांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले...

आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामातील अखेरच्या लढती पहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी अविश्वसीन प्रदर्शन केलंय. यात शुभमन गिल पासून साई सुदर्शन यांची झलक दिसून येते. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित (Virat Kohli) आणि विराटला (Virat Kohli) टी-ट्वेंटीमधून निवृत्तीचा सल्ला दिलाय.

May 15, 2023, 23:11 PM IST

Ravi Shastri On Virat & Rohit: आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामातील अखेरच्या लढती पहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी अविश्वसीन प्रदर्शन केलंय. यात शुभमन गिल पासून साई सुदर्शन यांची झलक दिसून येते. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित (Virat Kohli) आणि विराटला (Virat Kohli) टी-ट्वेंटीमधून निवृत्तीचा सल्ला दिलाय.

1/5

टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी संघासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापेक्षा मोठा विचार करून टी-ट्वेंटी फॉर्मेटमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना समाविष्ट करा, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

2/5

यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा आणि तिलक वर्मा या खेळाडूंना तत्काळ संधी द्यायला हवी. रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलं आहे. ते काय आहेत, हे कोणापासून लपलेलं नाही, असं रवी शास्त्रींनी म्हटलंय.

3/5

आता युवा खेळाडूंना संधी मिळताना पहायला आवडेल. जेणेकरून विराट आणि रोहितसारखे खेळाडू वनडे आणि कसोटी क्रिकेटसाठी ताजेतवानं राहतील, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.

4/5

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अजून एक वर्ष बाकीये. आयपीएलनंतर पहिली ट्वेंटी मालिका खेळेल त्यात युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असं मत देखील त्यांनी नोंदवलं आहे.

5/5

सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू कोण? कोणाच्या कामगिरीत सातत्य आहे? धावा कोण करत आहे? हे सर्व पहायला हवं, तसेच हार्दिक नेतृत्व करण्यास सक्षम आहे, असंही शास्त्री यांनी म्हटलं आहे.