नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका, अन्यथा वैवाहिक आयुष्यात वादळ येईल

लग्नानंतर दोघा पती-पत्नींमध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरुनही भांडणं होतात. मात्र अशावेळी काय करावं, हे समजत नाही. 

| May 21, 2024, 18:11 PM IST

Married Life Tips: लग्नानंतर दोघा पती-पत्नींमध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरुनही भांडणं होतात. मात्र अशावेळी काय करावं, हे समजत नाही. 

1/7

नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका, अन्यथा वैवाहिक आयुष्यात वादळ येईल

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

नवरा -बायकोमध्ये कितीही कडाक्याचे भांडण झाले तरी ते सकाळपर्यंत मिटलंच पाहिजे. नाहीतर अशावेळी नात्यात दरी निर्माण होते. जर वेळेतच भांडण मिटवलं नाही तर त्याचे पडसाद पुढच्या वैवाहिक आयुष्यावर उमटतात. 

2/7

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

नात्यांमध्ये भांडण होणे गरजेचेच आहे पण वाद किती ताणावा हे आपल्या हातात असते. अशावेळी नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर पत्नीने काही गोष्टी बोलणे टाळावे. नाहीतर रागाचा आणखी भडका उडू शकतो. 

3/7

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

भांडण झाल्यानंतर कधी कधी रागाच्या भरात पतीला उलटे सुलटे बोलून जातो त्यामुळं भांडण अधिक ताणले जाऊ शकते आणि संबंध बिघडू शकतात. अशावेळी पत्नीने चुकूनही पतीसमोर हे विषय काढू नयेत. 

4/7

जुन्या चुका आठवण करुन देऊ नका

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

पतीसोबत भांडण झाल्यानंतर कधीच पतीच्या जुन्या चुका त्याला आठवून देऊ नका. कारण जुन्या गोष्टी उकरुन काढल्यानंतर वाद अजून ताणू शकतो आणि भांडण वाढू शकते. शक्यता भांडण झाल्यानंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा.

5/7

भांडण लवकर संपवण्याचा प्रयत्न करु नका

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

अनेकदा भांडण झाल्यानंतर महिला वर्ग खूप भावनिक होतात आणि लगेचच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळं वाद अधिक चिघळू शकतो. त्यामुळं वाद शांत झाल्यानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. चिडलेल्या पतीला समजवायला जाल तर कदाचित त्याचा राग अधिक वाढण्याची शक्यता असते. 

6/7

दिखावा करु नका

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

तुम्हाला पतीसोबत भांडण मिटवायचे असेल तर चांगल्या मनाने प्रयत्न करा. फक्त दिखावा करण्यासाठी भांडण सोडवू नका. जर चुक तुमची आहे तर माफी मागण्यासाठी कोणताही मागचा पुढचा विचार करु नका आणि प्रकरण लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. 

7/7

पतीच्या नातेवाईकांवर काही बोलू नका

 Wife Should Not Say these 4 things to her Husband

अनेकदा असं होतं की पती-पत्नींमध्ये वाद झाल्यानंतर अनेकदा एकमेकांच्या नातेवाईकांवर कमेंट करतात. त्यामुळं पत्नीनी कधीच याची सुरुवात करु नये. नाहीतर पतीदेखील माहेरच्या लोकांबद्दल बोलण्यास सुरुवात करेल व हे चक्र सुरूच राहिल.