PHOTO: ट्रकवर लिहिलेल्या 'युझ डिपर ऍट नाइट' चा अर्थ फक्त तेवढाच नाही, थेट Condom शी कनेक्शन
Use Dipper at Night on Truck Meaning: भारतात प्रवास करताना अनेक ट्रकवर आपल्याला 'युझ डिपर ऍट नाइट' (Use Dipper at Night) असा मॅसेज दिसतो. पण या वाक्यातून वेगळाच अर्थ सुचित करायच आहे. याचा थेट संबंध हा कंडोमशी आहे. रोडवरुन प्रवास करत असताना ट्रक किंवा जड वाहनांवर 'युझ डिपर ऍट नाइट' (Use Dipper at Night) अस आवर्जून लिहिलेलं असतं. अनेकदा प्रवास करताना आपल्या नजरेला हे शब्द दिसतात. रात्री प्रवास करताना ड्रायव्हरने डिपरचा वापर करावा असा साधा अर्थ यामधून सुचित होतो. पण हे इतकंच नाही आहे. या चार अक्षरी शब्दांमधून मोठा अर्थ सांगायचा आहे. तो कोणता? ते पाहूया.
1/8
मूळ अर्थ काय
'युझ डिपर ऍट नाइट' या शब्दाचा अर्थ आहे खास करुन रात्री प्रवास करताना चालकांना मोठ्या लाइटमुळे कोणताही त्रास होऊ नये किंवा कोणत्या अपघातापासून बचाव करण्यासाठी डिपर लाईटचा वापर करावा. जर गाडीची लाईट थेट समोरून येणाऱ्या चालकाच्या थेट डोळ्यात गेली तर त्याला काही क्षण दिसत नाही अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते.
2/8
नेमकं काय सांगायचंय?
3/8
चालकांसाठी खास मोहिम
2005 मध्ये ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (TCI) द्वारे केलेल्या संशोधनात असे आढळले की, भारतातील 20 लाख ट्रक ड्रायव्हर सेक्स वर्करकडे जातात. त्यातील फक्त 11 टक्केच ड्रायव्हर निरोध म्हणजे कंडोमचा वापर करतात. ड्रायव्हरमध्ये एड्स या जीवघेण्या आजाराबाबत जागरुकताच नव्हती. 16 टक्के ड्रायव्हर कोणत्या ना कोणत्या आजाराशी निगडीत होते. अशावेळी त्यांना जागरुक करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली.
4/8
एड्स कंट्रोल करण्यासाठी
5/8
कंडोमची खास जाहिरात
भारतातील ट्रक चालक हजारो किलोमीटर प्रवास करतात. अशावेळी ते महिनों महिने आपल्या घरापासून लांब राहतात. या दरम्या वेश्या महिलांच्या संपर्कात आल्यावर अनेकांना AIDS ची लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यावेळी एड्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी NACO ने मोफत कंडोमची जाहिरातही केली होती. तेव्हा त्याला निरोध (Nirodh) असं नाव दिलं होतं.
6/8
असं केलं प्रमोशन
त्यावेळी नॅशनल एंड्स कंट्रोल ऑर्गनायजेशन मोफत निरोध वितरीत करत होते. पण त्यांच्या लक्षात आलं की, ट्रक ड्रायव्हर आणि सेक्स वर्कर या दोन वर्गासाठी खास ब्रँड आणणे गरजेचे आहे. त्यावेळी चर्चेमध्ये ड्रायव्हरसाठी अतिशय महत्तावाचा शब्द आणि रोजच्या वापरातील शब्द होता Dipper. कारण Dipper म्हणजे हलका प्रकाश असलेली लाईट लावणे आवश्यक आहे. आणि यामधून तोच संदेश दिला की, शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे.
7/8