पॅडी दादाच्या लोकप्रियतेचं नक्की कारण काय? ना बिगबॉस, ना कोणता सिनेमा; 'हे' आहे खरं कारण

नव्याने चर्चेत आलेले पॅडी दादाचे नाव काही वर्षांपूर्वीसूद्धा गाजले होते.  

Sep 30, 2024, 18:57 PM IST

सध्या फार चर्चेत असलेल्या पॅडी कांबळे बद्दल जाणून घ्या. कसा झाला एवढा लोकप्रिय. 

1/8

पॅडी कांबळे

सध्या 'पॅडी कांबळे' म्हणजेच पंढरीनाथ कांबळे फार चर्चेत आहेत. दूरदर्शन वाहिनीवरील मालिका, छोट्या-छोट्या भूमिका साकारणाऱ्या पॅडीचा चेहरा हळूहळू मराठी रसिकांच्या ओळखीचा झाला. पॅडी त्याच्या भन्नाट विनोदी स्वभावामुळे मराठी सिनेसृष्टीतही आला.   

2/8

गाजलेले सिनेमे

2005 साली त्याने 'मुन्नाभाई एस.एस.सी' चित्रपटामधून मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकले. त्याच वर्षी 'खबरदार' या गाजलेल्या चित्रपटातसूद्धा पॅडी झळकला. नंतर 2012ला भरत जाधवसोबत 'येड्यांची जत्रा' या सिनेमात तो दिसला आणि त्याचा अभिनय पाहून सगळेणज प्रेमात पडले. 

3/8

सुरुवात

सर्वांचा चाहता पॅडी दादा महाविद्यालयात असताना नाटकांमधून अभिनय करायचा. बऱ्याच नाटकांच्या छोट्या-मोठ्या प्रयोगांतून त्याने स्वतःच्या अभिनयाला आकार दिला. 

4/8

विनोदी कार्यक्रम

फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रमात पॅडीचा सहभाग  होता. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामूळे पॅडीची लोकप्रियता आणखी वाढली. 

5/8

बिगबॉस मराठी

या वर्षीच्या 'मराठी बिगबॉस'च्या स्पर्धकांमध्ये पॅडीचा समावेश होता. पॅडी बिग बॉसमधून बाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटत आहे. सोशल मीडियावर सध्या पॅडीचे गोडवे गायले जात असून बिग बॉसला प्रचंड ट्रोल केले जात आहे.  

6/8

सुपरहिट जोडी

मात्र ही लोकप्रियता फक्त बिगबॉसमधील पॅडीच्या खेळासाठी किंवा पॅडीच्या सिनेमातील भूमिकांसाठी नाही. मराठी रसिकांचं पॅडीवर खरं प्रेम जडलं ते पॅडी आणि निर्मिती सावंत या जोडीमुळे. एकेकाळी ही जोडी गावोगावी फिरून नाटकांचे प्रयोग करायची.

7/8

कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक

2005 ते 2006 कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक ही मालिका ईटिव्ही मराठीवर या वाहिनीवर प्रसारित व्हायची. या मालिकेतील मुख्य जोडी निर्मिती सावंत आणि पॅडीची होती. मालिका रसिकांना फार आवडली होती. नंतर या मालिकेच्याच कथानकावरुन चित्रपट आणि नाटक क्षेत्रातही ही जोडी झळकली   

8/8

गाजलेलं नाटक

कुमारी 'गंगूबाई मॅट्रिक' या विनोदी आणि गंभीर नाटकात, पॅडी आणि निर्मिती सावंत या दोघांनी साकारलेल्या भूमिका, लोकांना फार आवडल्या होत्या. ही जोडी काही ठराविक काळासाठीच एकत्र झळकली. मात्र जेवढे प्रयोग केले तेवढे दोघांनी गाजवले होते.