Bhaubeej 2024 : भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला नारळ का देते?

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला नारळ का देते? तुम्ही माहिती आहे का? वाचा सविस्तर 

Soneshwar Patil | Nov 03, 2024, 12:41 PM IST
1/6

भाऊबीज

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला समर्पित आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला येतो. 

2/6

यम द्वितीया

अनेक ठिकाणी भाऊबीज हा सण यम द्वितीया या नावानेही ओळखला जातो. यावर्षी भाऊबीज 03 नोव्हेंबरला साजरी होणार आहे.

3/6

प्रेमाचा उत्सव

रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊ-बहिणीतील प्रेमाचा उत्सव साजरा करणारा हा भाऊबीज हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  

4/6

नारळ

भाऊबीजच्या शुभ दिवशी तिलक लावण्याची आणि भावाला अन्नदान करण्याची श्रद्धा आहे. या दिवशी टिळा लावल्यानंतर भावाला नारळ भेट देण्याचीही परंपरा आहे. 

5/6

विशेष महत्त्व

हिंदू धर्मातील कोणत्याही पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते आणि भाऊबीजच्या पवित्र सणाला त्याचे महत्त्व अधिक वाढते. 

6/6

कारण

ज्या बहिणी आपल्या भावाला टिळा लावून नारळ देतात त्या भावाचे आरोग्य नेहमी चांगले राहते. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी नारळ देण्याची परंपरा आहे.