पत्नी ऐश्वर्या की आई जया बच्चन, अभिषेक बच्चन कुणाला जास्त घाबरतो? बहीण श्वेता म्हणाली तो...

अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेकने खुलासा केला होता की, तो पत्नी ऐश्वर्या आणि आई जया बच्चन यांच्यापैकी तो कोणाला जास्त घाबरतो? जाणून घ्या सविस्तर

| Aug 18, 2024, 15:49 PM IST
1/7

उत्तम अभिनेता

अभिषेक बच्चन हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक परफेक्ट फॅमिली मॅन देखील आहे. तो त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ असतो. 

2/7

अभिषेक आणि ऐश्वर्या चर्चेत

मात्र, अभिषेकचे पत्नी ऐश्वर्या रायसोबतचे नाते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरु असल्याची चर्चा आहे. 

3/7

बहीण श्वेता बच्चन

दरम्यान, अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेकने खुलासा केला होता की, तो पत्नी ऐश्वर्या आणि आई जया बच्चन यांच्यापैकी तो कोणाला जास्त घाबरतो? 

4/7

'कॉफी विथ करण'शो

अभिषेक बच्चन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'शोमध्ये त्याची बहीण श्वेतासोबत आला होता. तेव्हा करणने विचारले होते की, ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यामध्ये तुम्हाला कोणाची जास्त भीती वाटते? 

5/7

कोणाला जास्त घाबरतो?

यावर अभिषेकने आई जया बच्चन यांचे नाव घेतले होते. पण यावेळी त्याची बहीण श्वेता म्हणाली होती की, अभिषेक पत्नी ऐश्वर्याला जास्त घाबरतो. आई विषयी बोलताना अभिषेक म्हणाला होता की, ती माझी आई आहे आणि मला हे बंधन आवडते. 

6/7

नात्यात बदल

करण जोहरनेही अभिषेकला विचारले होते की, ऐश्वर्यासोबतच्या नात्यात काही बदल करायचे आहेत का? यावर अभिषेक म्हणाला की, त्याला बदलायला आवडेल असे काहीही नाही. कारण ऐश्वर्यासोबतचे त्याचे नाते त्याला नेहमीच हवे होते. 

7/7

विचार करत नाही

अभिषेकबद्दल बोलताना बहीण श्वेता म्हणाली की, अभिषेक त्याच्या आईबद्दल बोलण्यापूर्वी अजिबात विचार करत नाही, तर तो सर्व गोष्टींचा विचार करुन पत्नीबद्दल बोलत असतो.