Gaganyaan Mission : भारत इतिहास रचणार! गगनयान मिशनचे 4 अंतराळवीर कोण? जाणून घ्या...

Gaganyaan Mission Astronauts : गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणते आंतराळवीर असतील? याचं उत्तर आता समोर आलंय.

| Feb 27, 2024, 20:18 PM IST

Gaganyaan Mission : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम म्हणजेच सर्वात महत्त्वाचा अशी गगनयान मोहिम राबवत आहेत.

1/7

गगनयान मोहिम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली अन् मोहिमेचा नारळ फोडला होता. गेल्या पाच वर्षात इस्त्रोने मोठी तयारी सुरू केली. गगनयान मोहिमेसाठी GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट निवडलं आहे.

2/7

पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी आज गगनयान मोहिमेतील चारही अंतराळवीरांना एस्ट्रोनॉट्स विंग्स दिले. पंतप्रधान मोदींनी त्यावेळी चारही अंतराळवीरांचं अभिनंदन आणि त्यांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

3/7

अंतराळवीर कोण ?

यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे. मात्र, हे भारतासाठी इतिहास रचणाऱ्या जाणारे अंतराळवीर कोण आहेत? जाणून घेऊया...

4/7

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णनन नायर

प्रशांत बालकृष्णनन नायर यांचा 26 ऑगस्ट 1976 रोजी केरळ येथील तिरुवाझियादमध्ये जन्म झाला. एनडीएमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांना वायुसेना अकादमीकडून सन्मानाची तलवार मिळाली. 19 डिसेंबर 1998 रोजी नायर हवाई दलाच्या कार्यक्रमात सामील झाले. नायर यांना अंदाजे 3000 तास उडण्याचा अनुभव आहे.

5/7

ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन

19 एप्रिल 1982 रोजी जन्मलेल्या अजित कृष्णन यांनी एनडीएमधून सैन्य प्रशिक्षण पूर्ण केलं. अजित कृष्णन मुळचे चेन्नईचे... 21 जून 2003 रोजी त्यांना भारतीय वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये सामील करण्यात आलं होतं. त्यांना 2900 तास फ्लाईट चाचणीचा त्यांना अनुभव आहे.

6/7

ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप

युपीच्या प्रयागराजमध्ये जन्मलेल्या अंगद प्रताप यांनी एनडीएमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलंय. 17 जुलै 1982 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर 18 डिसेंबर 2004 मध्ये ते हवाई दलाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. 2000 तासाहून अधिक वेळ विमान उडवण्याचा त्यांचा अनुभव आहे.

7/7

विंग कमांडर शुभांशु शुक्ला

लखनऊच्या शुभांशूने एनडीएमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलंय. 17 जून 2006 रोजी त्यांनी हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये प्रवेश केला. अनेक यशस्वी उड्डाण आणि हवाई कसरती करण्यात शुभांशू चॅम्पियन आहेत. असंख्य न पेलणारी विमानं देखील त्यांनी उडवली आहेत.