भारतातील सर्वात सुरक्षित SUV कोणती? टॉप-5 वाहनांची यादी पाहा

Safest SUV in India: कार खरेदी करण्यापूर्वी आपण बजेटसोबतच सुरक्षित प्रवासाकडेही पाहतो. वाहन कुटुंबाचा एक सदस्य आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करताना वाहन सुरक्षित आणि आरामदायी असणं गरजेचं आहे. नवीन वर्षात अनेकांनी वाहन खरेदी करण्याची योजना आखली आहे. जर तुम्ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ग्लोबल NCAP ची मदत होऊ शकते. ही एजन्सी वाहनांची अपघात सुरक्षा तपासते आणि त्या आधारे रेटिंग देते. 

Dec 22, 2022, 13:20 PM IST
1/5

crash test

Skoda Kushaq/Volkswagen Taigun:  ग्लोबल NCAP ने दोन्ही एसयूव्हीला सुरक्षिततेच्या बाबतीत पहिलं स्थान दिले आहे. प्रौढ रहिवासी संरक्षणात 5 स्टार रेटिंग, लहान मुलांच्या संरक्षणात 5 स्टार रेटिंग दिले आहे. Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun ची सुरुवातीची किंमत सुमारे 11.50 लाख रुपये आहे.

2/5

crash test

Mahindra Scorpio-N: ग्लोबल NCAP ने या गाडीला भारतीय रस्त्यांसाठी सर्वात सुरक्षित एसयूव्ही घोषित केलं आहे. एजन्सीच्या मते, महिंद्राची स्कॉर्पिओ एन ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही आहे. एसयूव्हीला एजन्सीकडून प्रौढ रहिवासी संरक्षणामध्ये 5 स्टार मिळाले. तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 3 स्टार सापडले आहेत.  

3/5

crash test

Tata Punch: सुरक्षेच्या दृष्टीने देशातील सर्वात विश्वासार्ह एसयूव्हीमध्ये टाटाच्या टाटा पंचचाही समावेश आहे. या गाडीला प्रौढ रहिवासी संरक्षणात 5 स्टार, तर लहान मुलांच्या संरक्षणात 4 स्टार देण्यात आले आहेत. या गाडीची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये आहे.

4/5

crash test

Mahindra XUV300: ग्लोबल NCAP ने या महिंद्राच्या मॉडेलला प्रौढ रहिवासी संरक्षणात 5 स्टार दिले आहेत, तर लहान मुलांच्या संरक्षणात 4 स्टार दिले आहेत. या गाडीची सुरुवातीची किंमत 8.40 लाख रुपये आहे.

5/5

crash test

Mahindra XUV700: ग्लोबल NCAP ने देशातील सर्वात सुरक्षित SUV च्या टॉप-5 यादीमध्ये महिंद्राची तिसरी गाडी आहे. प्रौढ व्यक्तींच्या संरक्षणात 5 स्टार तर लहान मुलांच्या संरक्षणात 4 स्टार देण्यात आले आहेत. या गाडीची सुरुवातीची किंमत 13.45 लाख रुपये आहे.