पार्टनरसोबत जुलै महिन्यात फिरण्याचा प्लॅन करताय? कमी खर्चात देशातील 'या' 7 ठिकाणी जा

जुलै महिन्यात देशात अनेक ठिकाणी खूप सुंदर असा पाऊस असतो. याच महिन्यात पार्टनरसोबत रोमॅन्टिक ट्रिप प्लॅन करण्याचा बेस्ट वेळ असतो. अशात देशात अशी 7 ठिकाणं आहेत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आनंद घेऊ शकतात. 

| Jun 23, 2024, 17:04 PM IST
1/7

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. इथे स्ट्रॉबेरीची शेती असते. मुंबईपासून प्रवास करत असाल तर तुम्हाला 4000 रुपयात इथे तुम्ही आरामात फिरू शकतात. 

2/7

ऊटी

ऊटी हे लव्ह बर्ड्सच फेवरेट डेस्टिनेशनपैकी एक आहे. जर तुम्हाला पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवायचा असेल तर तुम्ही 18000 रुपयात जुलै महिन्यात एक सुंदर ट्रिप करु शकतात. 

3/7

तवांग

तवांगच्या डोंगर दऱ्या या पावसाळ्यात आणखी सुंदर दिसू लागतात. अशात तुमच्या पार्टनरसोबत फक्त 28 हजार ट्रिप प्लॅन करु शकतात. 

4/7

व्हॅली ऑफ फ्लावर

पावसाळ्यात व्हॅली ऑफ फ्लावरमध्ये एक सुगंधी सुवास येतो. या ठिकाणी तुम्ही केवळ 23 हजार रुपयांमध्ये ट्रिप प्लॅन करु शकतात. 

5/7

कोडैकनाल

तमिळनाडुतील कोडैकनाल हे सुंदर शहर जुलै महिन्यात फिरण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत 20 हजार रुपयांमध्ये फिरू शकता. 

6/7

कूर्ग

कर्नाटकमध्ये असलेलं कूर्ग हे हिल स्टेशन त्याच्या चहा आणि कॉफीच्या बागांसाठी खूप फेमस आहे. इथे पावसाळ्यात सगळ्यात जास्त मज्जा येते. 22 हजार रुपयात तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ट्रिप प्लॅन करु शकतात. 

7/7

केरळ

पावसाळ्यात जर तुम्हाला केरळ फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही 15 हजारात फिरू शकतात.