'तोंड धुवून ये', प्रिती झिंटाकडे दिग्दर्शकाने केली होती विचीत्र मागणी; 26 वर्षांनंतर केला खुलासा

 मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे. जिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी आज क्वचितच कोणी असेल जे तिला ओळखत नसेल.  

Feb 11, 2024, 20:55 PM IST

 मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे. जिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी आज क्वचितच कोणी असेल जे तिला ओळखत नसेल. प्रीती झिंटा ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. आजपर्यंत प्रितीने कोई मिल गया, दिल है तुम्हारा, कभी अलविदा ना कहना आणि वीरसारखे हिट सिनेमा दिले आहेत. 

1/7

अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा

अभिनेत्री प्रिती झिंटाची चाहेत पुनरआगमनाची वाट पाहत आहेत. सिनेसृष्टीपासून प्रिती जरी लांब असली तरी आजही अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

2/7

अभिनेत्री प्रिती झिंटा चर्चेत.

दरम्यान, प्रितीने शाहरुख खानसोबतच्या 'दिल' चित्रपटाशी संबंधित एक किस्सा  शेअर केला असून, सध्या अभिनेत्री चर्चेत आहे.

3/7

26 वर्षांनंतर सांगितला किस्सा

प्रीती झिंटाने 26 वर्षांनंतर हा किस्सा शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.

4/7

प्रिती झिंटाने ट्विट करत लिहीलं...

प्रिती झिंटाने ट्विट शेअर करत लिहिलं आहे की, ''हा फोटो पहिल्या दिवशी दिल से चित्रपटाच्या सेटवर काढण्यात आला होता.''

5/7

दिग्दर्शकाने केली मागणी

पुढे प्रितीने लिहीलं, 'मणिरत्नम सर आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. मणी सरांनी मला पाहिल्यावर त्यांनी हसून नम्रपणे मला चेहरा धुवायला सांगितला पण सर… माझा मेकअप उतरेल, मी हसत म्हणाले. यावर सर मला म्हणाले मला हेच हवं आहे. प्लिज तुझा चेहरा धुवून ये.''

6/7

प्रिती झिंटाने सांगितलं नेमकं काय झालं

पुढे प्रिती म्हणते, ते परत हसले. मला वाटलं ते मस्करी करतायेत....मग मला कळलं की ती मस्करी नाहीये!!! त्यामुळे आश्चर्यकारक संतोष सिवन (आमचे छायाचित्रण दिग्दर्शक) यांना धन्यवाद, मी फ्रेश धुतलेल्या चेहऱ्यासोबत सिनेमा शूट केला. आणि पुढे गेले. मला वाटतं की, त्यांनी माझा हा सिनेमा मनापासून शूट केला.     

7/7

हे कलाकारही झळकले

या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर, दिल से हा सिनेमा 1998 मध्ये रिलीज झालेला चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रीती झिंटा आणि शाहरुख खान व्यतिरिक्त, मनीषा कोईराला, मलायका अरोरा, जोहरा सहगल आणि संजय मिश्रा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.