'तो' फोन कॉल आला नसता तर 'ही' हिरोईन असती गोविंदाची पत्नी! साखरपुड्यानंतर त्याने लग्न मोडलं अन्...

When Govinda Declared His Love For This Actress Called off Engagement: अभिनेता गोविंदाच्या या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल. तो एक फोन कॉल गेला नसता तर आज गोविंदा या अभिनेत्रीचा पती असता. गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडून या अभिनेत्रीबरोबर लग्नाची तयारी केली होती. त्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. नेमकं काय घडलेलं पाहूयात...  

| Nov 09, 2024, 16:48 PM IST
1/18

govindalovestory

इतर कोणी नाही तर स्वत: गोविंदांनेच सांगितली आहे त्याची ही पूर्ण न झालेली लव्ह स्टोरी. आपल्याला खरोखर या अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं असं गोविंदाने मुलाखतीत कबुल केलेलं. पण नेमकं काय घडलं पुढे जाणून घेऊयात...

2/18

govindalovestory

अभिनेता गोविंदा मागील काही आठवड्यांपासून चर्चेत आहे तो त्याच्याच शस्त्राने राहत्या घरात जखमी झाल्याने.   

3/18

govindalovestory

खरं तर गोविंदा हा 'लव्ह 86' चित्रपटामधून पदार्पण केल्यानंतर पुढील काही वर्षांमध्ये फार मोठा अभिनेता झाला. त्याने 90 चं दशक गाजवलं. मध्यंतरी तो अनेक रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला होता.

4/18

govindalovestory

याचवेळी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता या दोघांचं नातं खुलू लागलं. मात्र त्यांनी याबद्दल फार गुप्तता बाळगली होती. त्यांनी लपूनछपून एकमेकांशी लग्नही केलं. हे लग्नही त्यांनी एक वर्ष सर्वांपासून लपवून ठेवलं.

5/18

govindalovestory

मात्र याचवेळी गोविंदा अभिनेत्री निलमच्या प्रेमात पडला होता. निलम आणि गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं तोच हा काळ. त्यामुळेच गोविंदाला निलम आवडू लागली होती.   

6/18

govindalovestory

1990 साली 'स्टारडस्ट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदाने स्वत: यासंदर्भात भाष्य केलं होतं. एक काळ असा होता जेव्हा गोविंदाने सुनिताबरोबरचा साखरपुडा मोडला होता, कारण त्याला निलमशी लग्न करायचं होतं. त्यानेच ही कबुली दिली.

7/18

govindalovestory

आपण निलमबद्दल फार विचार करायचो. आम्ही दोघे फार वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधून आलो होतो. मात्र हे सारे अडथळे बाजूला करत मी तिच्याशी संवाद साधू लागतो. माझं मन तिच्याजवळ मोकळं करु लागलो, असं गोविंदाने सांगितले.

8/18

govindalovestory

"आम्ही एकमेकांचे मित्र झालो. आम्ही एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आम्ही अनेकदा एकमेकांना भेटायचो. प्रत्येक भेटीत एकमेकांना अधिक जवळून जाणून घेऊ लागतो तशी ती मला अधिक आवडू लागली," असं गोविंदा म्हणाला.  

9/18

govindalovestory

"ती (निलम) एवढी प्रेमळ आणि दायाळू होती की कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडून आपलं हृदय तिला देऊन बसेल. माझंही हेच झालं. मी माझं हृदय तिला देऊन बसलो," असं गोविंदा निलमबद्दल मुलाखतीत म्हणाला.

10/18

govindalovestory

याच कालावधीमध्ये आपण निलममध्ये दिवसोंदिवस गुंतत जात असताना तिच्या अखंड प्रेमात पडल्याने आपलं सुनिताबरोबर भांडणही झालं होतं, असंही गोविंदाने सांगितलं. या वादातूनच त्याने सुनिताबरोबरच्या नात्यातून माघार घेतलेली.

11/18

govindalovestory

"मी सुनिताला मला सोडून देण्यास सांगितलं. मी तिच्याबरोबर साखरपुडाही मोडला. मात्र पाच दिवसांनंतर सुनिताने मला कॉल केला नसता आणि नात्याबद्दल समजावलं नसतं तर मी निलमशी लग्न केलं असतं," असं गोविंदा म्हणाला. 

12/18

govindalovestory

"मला तिच्याशी (निलमशी) लग्न करायचं होतं. यात काहीही गैर आहे असं मला वाटतं नाही," असंही गोविंदा म्हणाला.

13/18

govindalovestory

मात्र नंतर गोविंदाला समजलं की निलमला त्याच्याशी लग्न करण्यात रस नाही. निलमला तिच्या करिअरवर लक्ष द्यायचं होतं.   

14/18

govindalovestory

"तिला (निलमला) हुशार, चांगला, छान दिसणारा पुरुष नवरा म्हणून हवा होता. मात्र मी तसा नव्हतो. ती उच्चभ्रू कुटुंबातील होती. मी गावातील मध्य वर्गीय कुटुंबातून आलेलो," असं दोघांबद्दल बोलताना गोविंदाने म्हटलं. 

15/18

govindalovestory

"आम्ही दोघे दोन टोकांवर होतो असं म्हणता येईल. विवाहित जोडपं म्हणून आम्ही कधीच यशस्वी ठरलो नसतो. निलमला याची जाणीव माझ्या आधी झाली असावी," असंही गोविंदा या न झालेल्या लग्नाबद्दल म्हणाला.

16/18

govindalovestory

सुनिताबरोबर लग्न केल्यानंतर गोविंदाने ही गोष्ट निलमपासून लपवून ठेवली होती. सुनिताबरोबर लग्न केल्यानंतरही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतरही त्याने हे सत्य लपवलं. 

17/18

govindalovestory

निलमने 2011 साली अभिनेता समीर सोनीबरोबर लग्न केलं.

18/18

govindalovestory

"मी माझं निलमबरोबरचं खासगी नातं प्रोफेश्नल कारणासाठी वापरलं. मी फार वाईट वागलो तिच्याबरोबर. मी तिला माझं लग्न झालं आहे हे सांगायला हवं होतं," असंही गोविंदा म्हणाला.