WhatsApp मधून चुकून Video किंवा Photo डिलीट झालाय! असं कराल रिस्टोर

WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वात प्रसिद्ध असं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. या मेसेजिंग अ‍ॅपवर लोकं तासंतास चॅट करत असतात. अनेकदा फोटो, व्हिडीओ आणि इतर मीडिया फाईल्स शेअर केल्या जातात. यामुळे स्टोरेज फूल होतं आणि काही फाईल्स आपण डिलीट करतो. कधी कधी चुकून एखादी महत्त्वाची फाईल डिलीट होऊन जाते आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण डिलीट केलेली फाईलही रिस्टोर करता येते. चला जाणून घेऊयात

Dec 02, 2022, 12:26 PM IST
1/5

WhatsApp Tips

व्हॉट्सअ‍ॅप By Default फोटो फोन किंवा गॅलरीमध्ये सेव्ह करतो. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्ही फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केला तरी गॅलरीत जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर गुगल फोटोजमध्येही सेव्ह होतं. 

2/5

WhatsApp Tips

अँड्रॉईड युजर्ससाठी गुगल ड्राईव्ह आणि iOS युजर्ससाठी iCloud वर चॅट आणि मीडिया बॅकअप घेतं. जर डेली बॅकअपनंतर मीडिया काढलं असेल तर तुम्ही तुमच्या डिव्हाईसवर गूगल ड्राईव्ह किंवा iCloud वर बॅकअप रिस्टोर करू शकता. 

3/5

WhatsApp Tips

सर्वात आधी आपल्या डिव्हाईसवरून व्हॉट्सअ‍ॅप अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा. त्याच नंबरवरून पुन्हा सेटअप करा. 

4/5

WhatsApp Tips

बॅकअपवरून डेटा रिस्टोरबाबत विचारलं जाईल तेव्हा ओके करा. एकदा सेटअप पूर्ण झाल्यानंतर मीडिया आणि कनवर्शन बॅकअप रिकव्हर होईल. 

5/5

WhatsApp Tips

मीडिया फोल्डरमधू रिस्टोरचं ऑप्शन फक्त अँड्रॉईड युजर्संना आहे. सर्वात आधी फाईल एक्सप्लोरर अ‍ॅप ओपन करा. व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरमध्ये जाऊन मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप इमेज फोल्डरमध्ये जा. इथे तुम्हाला सर्व फोटो दिसतील. डिलीट झालेले फोटोही तुम्ही शोधू शकता.