'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

| Jan 29, 2024, 16:34 PM IST

WhatsApp Chat Backup: व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

1/8

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या डोक्याला ताप! आता चॅट बॅकअपचेही मोजावे लागणार पैसे

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

Chat Backup: आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आहे. भारतासह जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे करोडो यूजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या डोक्याला ताप देणारा निर्णय झालाय. 

2/8

फ्री चॅट बॅकअप बंद

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

मेटाची मालकी असलेल्या इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपने अखेर फ्री चॅट बॅकअप बंद केले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला चॅट बॅकअपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

3/8

बीटा यूजर्ससोबत सुरुवात

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

व्हॉट्सअ‍ॅपने बीटा यूजर्ससोबत याची सुरुवात केली होती. असे होईल याची चर्चा आधीपासून सुरु होती. व्हॉट्सअ‍ॅपकडून बॅकअपसाठी यूजर्सच्या गूगल ड्राइव्हचा उपयोग केला जायचा. 

4/8

15 जीबी स्टोरेज

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

जीमेल अकाऊंटसोबत मिळणाऱ्या 15 जीबी स्टोरेजमधूनच ही स्पेस तुम्हाला वापरावी लागणार आहे. गुगुल फोटो, ड्राइव्ह आणि चॅट बॅकअप हे सर्वच यात करावे लागणार आहे. 

5/8

गुगलचा वन प्लान

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

तुमच्या जीमेल अकाऊंटमध्ये स्टोरेज कमी असेल आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट जास्त असतील तर अधिक स्टोरेजसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्हाला गुगलचा वन प्लान घ्यावा लागेल. 

6/8

मेटाकडून नोटिफिकेशन

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

व्हॉट्सअ‍ॅपला मेटाकडून यांसदर्भात नोटिफिकेशन मिळाले आहे. हे नोटिफिकेशन सध्या अॅंड्राइड बीटा वर्जन 2.24.3.21 वर मिळत आहे. तसेच गुगल ड्राइव्ह स्टोरेजमध्ये जाऊन तुम्ही स्टोरेज मॅनेज करु शकता. 

7/8

गरज नसलेले फोटो डिलीट

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

फ्री व्हॉट्सअ‍ॅप चॅटसाठी तुम्हाला गुगल ड्राइव्हच्या छोट्या छोट्या फाईल अपलोड कराव्या लागतील. गरज नसलेले फोटो डिलीट करावे लागतील. 

8/8

मेसेजचे बॅकअप

WhatsApp Chat Backup take Money From Users google Drive

सोप्या भाषेत सांगायचं तर तर गुगल ड्राइव्ह स्टोरेज खाली करावे लागेल. तसेच व्हिडीओ किंवा फोटोचे चॅट बॅकअप घेऊ नका केवळ मेसेजचे बॅकअप घेऊन तुम्ही स्पेस वाढवू शकता.