एका ईव्हीएम मशीनची किंमत किती? यंदा काय आहे खास

भारतात निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबद्दल जाणून घ्या सर्व काही...

| Mar 12, 2019, 10:59 AM IST

भारतात निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबद्दल जाणून घ्या सर्व काही...

1/9

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्य़ा आहेत. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएम मशीनला आणखी अपग्रेड करण्यात आलं आहे. यंदा देशात ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेतलं जाणार आहे.  

2/9

किती आहे किंमत?

किती आहे किंमत?

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 1989-90 मध्ये जेव्हा ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात आल्या तेव्हा एका मशीनची किंमत ही (एक कंट्रोल युनिट, एक बॅलेटींग युनिट आणि एक बॅटरी) 5500 रुपये होती. ईव्हीएम मशीनचा खर्च बॅलेट पेपरच्या खर्चापेक्षा कमी आहे.

3/9

कशी बनली ईव्हीएम?

कशी बनली ईव्हीएम?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही अनेक बैठकानंतर, परीक्षण केल्यानंतर आणि अनेक वेळा त्याची ट्रायल घेतल्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरु आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हैदराबाद यांच्या सहयोगाने निवडणूक आयोगाकडे सोपवली.

4/9

यंदा नवं काय ?

यंदा नवं काय ?

यंदा ईव्हीएमवर सगळ्या उमेदवारांचे नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह तर असणारच आहे. पण यासोबतच सगळ्या ईव्हीएमसोबत वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन देखील असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही मत दिल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. ज्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान केलं त्याची माहिती तुम्हाला मिळेल. मतदानानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीएस सिस्टम असणार आहे.

5/9

काय आहे ईव्हीएम?

काय आहे ईव्हीएम?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाच-मीटर केबलने जोडलेली २ युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेटिंग युनिट पासून बनलेली असते. कंट्रोल युनिट मतदान अधिकाऱ्यांकडे असते. बॅलेटिंग युनिट वोटिंग कम्पार्टमेंटमध्ये ती ठेवली जाते.

6/9

कधी झाली सुरुवात?

कधी झाली सुरुवात?

भारतात पहिल्यांदा नोव्हेंबर 1998 मध्ये 16 व्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. मध्य प्रदेशमध्ये 5, राजस्थानमध्ये 5, दिल्लीमध्ये 6 जागांवर पहिल्यांदा ईव्हीएमने मतदान झालं होतं.

7/9

वीज नसतानाही वापर

वीज नसतानाही वापर

ईव्हीएम 6 वोल्टच्या एका बॅटरीवर चालते. जेथे वीज नाही अशा ठिकाणी देखील ईव्हीएम मशीनचा वापर केला जाऊ शकतो.

8/9

किती मतदारांसाठी एक ईव्हीएम?

किती मतदारांसाठी एक ईव्हीएम?

ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 3840 मतं नोंदवले जावू शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० मतदारचं मतदान करतात. त्याच्या आधारावर ईव्हीएम मशीनची संख्या ठरवली जाते.

9/9

उमेदवारांची संख्या ?

उमेदवारांची संख्या ?

एका ईव्हीएममध्ये 64 उमेदवारांची नावं ठेवली जाऊ शकतात. वोटींग मशीनमध्ये मात्र 16 उमेदवारांचीच यादी असते. 16 पेक्षा अधिक उमेदवार असल्यास वोटिंग मशीनची संख्या वाढते. पण जर उमेदवारांची संख्या 64 पेक्षा अधिक असेल तर तेथे बॅलेट पेपरने मतदान घेतलं जातं.