लाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?

Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात.   

| Oct 15, 2024, 18:10 PM IST
1/6

आहारतज्ज्ञ सांगतात की, हिरव्या रंगाचे सफरचंद हे चवीला थोडे आंबट असतात तर त्यांची साल ही थोडी जाड असते. तर लाल रंगाचे सफरचंद हे गोड, रसाळ आणि पातळ सालीचे असतात. त्यामुळे हिरव्या रंगाच्या सफरचंदपेक्षा लोकं लाल सफरचंद खाण्याला पसंती देतात. 

2/6

नेमका काय फरक असतो? :

हिरवं आणि लाल रंगाच्या सफरचंदाचे वेगवेगळे फायदे आहेत. हिरव्या रंगाच्या सफरचंदात लाल सफरचंद तुलनेत जास्त फायबर असतात. तसेच यात कार्बोहाइड्रेट आणि साखरेची मात्रा लाल सफरचंदच्या तुलनेत कमी असते. लाल सफरचंदमध्ये एंटी ऑक्सीडेंट भरपूर असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून रोखण्यास मदत करतात.

3/6

कोणतं सफरचंद जास्त हेल्दी?

आहारतज्ञांच्या मते हिरव्या आणि लाल सफरचंदांच्या पोषकतत्वांमध्ये खूप कमी अंतर आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तेव्हा हिरवं आणि लालपैकी कोणतं सफरचंद खावं हे व्यक्त आजारी आहे की निरोगी यावर अवलंबून असतं. 

4/6

हिरवं सफरचंद :

हिरव्या सफरचंदमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते. जे दृष्टी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच मुरुमांचा धोका कमी करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरते.

5/6

लाल सफरचंद :

लाल सफरचंद देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात. दोन्ही सफरचंदांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते. बाजारात लाल सफरचंद हिरव्या सफरचंद पेक्षा जास्त विकले जातात कारण ते जास्त चविष्ट असतात. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)