तरूणांमध्ये प्रचलित Boysober रिलेशनशिप ट्रेंड नेमका आहे तरी काय?

वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक प्रकारचे रिलेशनशिप स्टेटस आपल्यासमोर येत असतात. जगभरामध्ये वाढणाऱ्या या नव्या रिलेशनशिप ट्रेंडमुळे तरूण पिढी नेहमीच चर्चेत असते.

Jul 06, 2024, 12:52 PM IST
1/7

काही दिवसांआधी रिलेशनशिपमध्ये चालू असलेला Situationship हा ट्रेंड भरपूर चर्चेत होता. पण आता कोणता ट्रेंड चालू आहे हे तुम्हाला माहित आहे का? जगभरातील तरूणाईमध्ये वाढत असलेला 'बॉयसोबर' ट्रेंड नक्की आहे तरी काय?   

2/7

सोशल मीडियामुळे डेटिंगचे ट्रेंड सतत बदलताना दिसतात. याआधी मित्रांच्या माध्यमातून तरूण तरूणी भेट घेऊन डेटिंग, प्रेम आणि त्यानंतर लग्न असा पारंपरिक विचार करत असत. पण सोशल मीडियीमुळे जग जवळ आल्याने जास्त लोकांना भेटणं शक्य झालं आहे. त्यामुळे नव्या पिढीचा ऑनलाईन डेटिंग हा शब्द समोर आला आहे. 

3/7

फिजलिंग आणि मास्टर डेटिंग यांसारख्या शब्दांमुळे रिलेशनशिपचा नवा ट्रेंड तरूणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसतोय, तो म्हणजे 'बॉयसोबर' ट्रेंड. 'द इंडिपेंडेंट'च्या माहितीनुसार सांगितल्यानुसार 'बॉयसोबर' हा शब्द अमेरिकेतील हास्य कलाकार होप वुडार्डनं वापरला आणि त्यासंबंधीचे नियम देखील सांगितले. 

4/7

यामध्ये आत्ताची Z जनरेशन किंवा जेन झी म्हणून ओळखली जाणारी पिढी कोणत्याही ताणतणावापासून दूर राहणं पसंत करते. यामध्ये आपला स्वत:चा वेळ,  डेटिंगचा खोटा आव आणण्यापेक्षा ती ऊर्जा स्वत:ला आनंदी ठेवण्यात खर्च करते. ज्यामध्ये कोणत्याही डेटिंग अॅपच्या भानगडीत पडणं त्यांना वेळ वाया घालवल्यासारखे वाटते.

5/7

'बॉयसोबर' या नावावरून तुम्हाला असं वाटेल की हा ट्रेंड फक्त महिलांसाठी आहे तर असं नाही. यामध्ये कोणताही लिंगभेद नसून या प्रकारचं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाला 'बॉयसोबर' म्हटलं जातं. अमेरिका आणि युरोपमध्ये हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. तर भारतात काही ठिकाणी इंडिपेंडेंट असणारे तरूण 'बॉयसोबर' हा पर्याय स्वीकारत आहेत.   

6/7

वुडार्डनं सांगितल्याप्रमाणे 'बॉयसोबर' मार्ग स्विकारणारे मुलं मुली स्वत:ला त्रास न करून घेण्यासाठी किंवा हुक-अप्सच्या नादी लागण्यापेक्षा स्वत:साठी वेळ खर्च करणं पसंत करतील. स्वत:च्या आयुष्याचा आढावा घेत विश्लेषण करूनच भविष्यात काय हवं आहे याचा विचार करतील. 

7/7

'बॉयसोबर' हा ट्रेंड ब्रह्मचर्यापेक्षा खूप वेगळी आहे असे देखील वुडार्डनं सांगितलं आहे. तुम्ही शारीरिक संबंध ठेवले नाहीच तर तुम्ही प्रेमळ आणि आदरणीय आहात असा खोटा दावा द्यायचा नाही असं देखील वुडार्ड म्हणाले. हा एक जीवनात रिलेशनशिपपासून ब्रेक घेण्यासारखा प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्ही स्त्री किंवा पुरूषांच्या परवानगीशिवाय तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, असं वुडार्डने स्पष्ट केलं आहे.