Weight Loss Yoga : घरच्या घरी वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचंय? मग सकाळी बेडवरच करा 'हे' योगासन

Weight Loss Yoga : जीम आणि व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. पण वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचं आहे? मग सकाळी उठल्यावर बेडवरच योगा करुन तुम्ही वजन कमी करु शकता. 

Dec 01, 2023, 11:18 AM IST
1/7

बदलेली जीवनशैली, कामाचा वाढता ताण, अवेळी खाणं आणि एका जागेवर बसून काम यामुळे वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.   

2/7

वाढत्या वजनामुळे तुम्हाला आरोग्याची समस्यांना तोंड द्यावे लागतं. वजन कमी करण्यासाठीही जीम आणि व्यायामासाठी तुम्हाला वेळ मिळतं नाही. 

3/7

अशावेळी घरच्या घरी सकाळी उठल्यावर पलंगावरच उत्तम योगासने करुन तुम्ही वजन कमी करु शकता. 

4/7

बटरफ्लाय आसन

यामध्ये तुम्ही बसून किंवा झोपून हे आसन करु शकता. तुम्हाला तुमच्या पायाची दोन्ही बोटे जोडून गुडघे वाकवून त्यांना वर आणा. जर तुम्ही बसून करत असाल तर दोन्ही हातांनी बोटे धरा. झोपताना असे करत असाल तर हात सरळ ठेवा. पोटाच्या सुलभ अवयवांसाठी हे फायदेशीर ठरतं. 

5/7

परिव्रत सुखासन

यासाठी तुमचं पाय मांडी घालून बसा आणि फक्त तुमची कंबर वळवा. प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे. त्याच पद्धतीने आसन पुन्हा करा. हे आसन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत मिळते.

6/7

नौकासन

या योगामुळे मन शांत राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे योगासन करण्यासाठी हात शरीराजवळ न्या. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. तुम्ही श्वास सोडत असताना, तुमची छाती आणि पाय जमिनीवरून उचला. हात पायांकडे खेचा. 

7/7

बध्द कोनासन

बध्द कोनासन शरीराला बळ देण्यास मदत होते. त्याच्या नियमित सरावाने तुम्ही पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)