Weather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...
Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
Weather News : देशाच्या बहुतांश भागात सध्या असणारी हवामानाची परिस्थिती पाहता, नेमका ऋतू कोणता हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामानाचा इशारा देणाऱ्या वेधशाळेकडूनही सातत्यानं महाराष्ट्रासह देशातील काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीचाच इशारा देण्यात येत असल्यामुळं उन्हाळा कुठे पळाला का? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
1/6
latest rain alert
2/6
weather news
'स्कायमेट'च्या वृत्तानुसार सध्या अफगाणिस्तान आणि नजीकच्या क्षेत्रांवर पश्चिमी झंझावातसदृश्य परिस्थिती तयार झालीआहे. राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शुक्रवार आणि शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
3/6
IMD Alert
4/6
rain predictions
5/6
weather news latest update
6/6