Vitamin B12 मिळविण्यासाठी मटण, मासे खाण्याची गरज नाही, या शाकाहारी पदार्थांमधून भरपूर पोषक घटक

.

| Mar 18, 2023, 15:26 PM IST

Vitamin B12 Rich Food : आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) ची नितांत गरज असते. त्यामुळे आपण मटण, मासे खाण्यावर भर देत असतो. मात्र, असे काही करण्याची आता गरज नाही.  Vitamin B12 आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहे, त्याची कमतरता असल्यास चिडचिड, तणाव आणि अशक्तपणाला सामोरे जावे लागते. तसेच जास्त आजारी पडणे, तसेच अशक्तपणा आणि मज्जातंतूंचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. मटण आणि मासे या सारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये Vitamin B12  मुबलक प्रमाणात आढळते. मात्र, जे मटण आणि मासे खात नाही, त्यांनी अजिबात घाबरु नये. कारण तुम्हाला आम्ही काही शाकारी पदार्थातून हा पोषक घटक मिळतो, ते सांगणार आहोत. या 5 गोष्टी खाऊनही Vitamin B12 मिळवू शकता.

1/5

दूध

दूध

शाकाहारी लोकांनी Vitamin B12 साठी दूध पिणे योग्य आहे. कारण दुधामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील चांगले असते. जर तुम्ही रोज एक ग्लास लो फॅट दूध प्यायले तर शरीरात B12 ची कमतरता भासणार नाही.

2/5

दही

दही

मटण आणि मासे वगळता दहीमधूनही Vitamin B12 मिळते. आपण सहसा जेवणानंतर दही खातो जेणेकरुन पचनक्रिया व्यवस्थित चालते. परंतु व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दुग्धजन्य पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. एक कप दह्यामध्ये 28 टक्के Vitamin B12 असते.

3/5

फळे भाज्याफळे भाज्या

फळे भाज्या

शाकाहारी लोकांनी काही फळे आणि भाज्या खाण्यास प्राधान्य दिले तर Vitamin B12 ची गरज पूर्ण होऊ शकते. अनेक ताजी फळे आणि भाज्या (Fruits and Vegetable) आहेत, ज्यांच्या सेवनाने  Vitamin B12 मिळते. बटाटे, मशरुम, बीटरुट इत्यादी व्हिटॅमिन बी 12 मिळते. जर तुम्ही हे नियमितपणे खाल्ले तर शरीरात B12 ची कमतरता होणार नाही.

4/5

फोर्टिफाइड तृणधान्ये

 फोर्टिफाइड तृणधान्ये

व्हिटॅमिन बी 12 मिळण्यासाठी फोर्टिफाइड तृणधान्याला प्राधान्य द्या. तसेच लोह, व्हिटॅमिन ए आणि फोलेट देखील आढळतात. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओटमील, ओट्स आणि इतर संपूर्ण धान्यांचा समावेश करु शकता.

5/5

फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध

फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध

शाकाहारी लोकांनी फोर्टिफाइड नॉन-डेअरी दुधाच्या पदार्थांना प्राधान्य दिले पाहिजे. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधाबरोबरच अशी अनेक फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध आहेत ज्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता नसते. आपण दररोज सोया दूध आणि बदामाचे दूध पिऊ शकता.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)