डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...

Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

Swapnil Ghangale | Oct 06, 2024, 11:45 AM IST
1/13

dipeshmhatre

डोंबिवलीमधील विधानसभा निवडणुकीतील चूरस अधिक वाढणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घ्या नेमकी कोणी सोडलीये शिंदेंची साथ आणि यामागील कारणं काय असून विधानसभेवर कसा परिणाम होऊ शकतो.

2/13

dipeshmhatre

डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडलं आहे. डोंबिवलीमधील एक महत्त्वाच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.  

3/13

dipeshmhatre

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेचे निकटवर्तीय असलेले शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे  ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.   

4/13

dipeshmhatre

दीपेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.  

5/13

dipeshmhatre

दीपेश म्हात्रेंसोबत कल्याण-डोंबिवली महापालिकेमधील चार माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  

6/13

dipeshmhatre

6 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  

7/13

dipeshmhatre

शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे शिंदेंसोबत होते. युवासेना सचिवपदी ते शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत होते.  

8/13

dipeshmhatre

मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतील दीपेश म्हात्रे हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत असल्याचा पाहायला मिळत आहे.

9/13

dipeshmhatre

डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश म्हात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का? हे सुद्धा पहावं लागणार आहे.   

10/13

dipeshmhatre

 डोंबिवलीमध्ये महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून तणाव वाढलेला पाहायला मिळत होता. त्यातच दीपेश म्हात्रे यांना काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून धमक्या येत होत्या.  

11/13

dipeshmhatre

त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीतील वाढलेला तणाव त्यासोबत सध्याची राजकीय परिस्थिती याचा विचार करून दीपेश म्हात्रे हे शिंदे यांची शिवसेना सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे बोललं जात आहे.  

12/13

dipeshmhatre

खासदार श्रीकांत शिंदे याचे कट्टर समर्थक मानले जाते. डोंबिवलीमधून भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांचं तिकीट विधानसभेसाठी पक्क समजलं जात आहे.

13/13

dipeshmhatre

दीपेश म्हात्रे शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी सकाळी 11 च्या सुमारास डोंबिवलीहून शेकडो कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांसह 'मातोश्री'च्या दिशेने रवाना झाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिव बंधन बांधणार आहेत.