'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं

Actress Angry On Her Viral Photo: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अभिनेत्रीच्या या फोटोमध्ये ती अनेक पुरुषांबरोबर उभी असून हसत पोज देताना दिसतेय. मात्र हा फोटो सध्या एका वेगळ्याच कॅप्शनसहीत व्हायरल होत असल्याने याच व्हायरल कॅप्शनवरुन अभिनेत्रीने कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण आहे तरी काय...

| Jul 11, 2024, 15:58 PM IST
1/11

Ved Fame Actress

अभिनेत्री जिया शंकरला बिग बॉस ओटीटी-2 मधून अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावरही जियाचा मोठा चाहता वर्ग आहे.  

2/11

Ved Fame Actress

सध्या जियाने सोशल मीडियावरुन केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. जियाने तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवरुन अश्लील, वर्णद्वेषी कमेंट्स करणाऱ्यांना झापलं आहे.

3/11

Ved Fame Actress

जियाचा एक फोटो शेअर करत 'एक्स'वरील (आधीचं ट्वीटर) एका युझरने, 'मला माझ्या मनाबद्दल वाईट वाटतंय... मी नर्कातच गेलं पाहिजे,' अशी पोस्ट केली.   

4/11

Ved Fame Actress

या पोस्टवर जियाने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना संताप व्यक्त केला आहे. जियाने समोरच्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार असतील तर साधे फोटोही काढायचे नाहीत का असा सवाल केला आहे.  

5/11

Ved Fame Actress

जियाचा फोटो शेअर करणाऱ्याला तिने, "अपेक्षा आहे की नर्कात तू सडून मरशील. म्हणजे महिलांना कृष्णवर्णीय व्यक्तींबरोबर फोटो काढायचे नाहीत का?" असा सवाल केला आहे.  

6/11

Ved Fame Actress

"फोटोतील कृष्णवर्णीय माणसं त्या माहिलांचे मित्र असो, सहकारी असो चाहते असले तरी तुमच्यासारखी घाणेरड्या, वर्णद्वेषी आणि पॉ*च्या आहारी गेलेल्या विचारसणीची माणसं अशा साध्या फोटोमध्येही पॉ* पाहू शकतात?" असं म्हणत जियाने संताप व्यक्त केला आहे.  

7/11

Ved Fame Actress

"मला आता समजलं की आपल्या देशात पॉ*वर बंदी का घालण्यात आली आहे. या गोष्टीवर हसणारे आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांना याची लाच वाटली पाहिजे," असा टोलाही जियाने लगावला.  

8/11

Ved Fame Actress

'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं

9/11

Ved Fame Actress

जियाने 'एंठा आंदंगा उन्नावे' या तेलगू चित्रपटामधून अजय मंथेनाबरोबर 2013 मध्ये मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. 

10/11

Ved Fame Actress

जियाने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'लाल इश्क', 'प्यार तुने क्या किया', 'पिशाचिनी' आणि 'काटेलाल अँड सन्स'सारख्या मालिकांचा समावेश आहे.   

11/11

Ved Fame Actress

जियाने रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसोझाच्या 'वेड' चित्रपटामध्येही काम केलं आहे. 'वेड'मध्ये जियाने रितेशच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.