Vastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा

दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.

Dec 27, 2022, 15:51 PM IST
1/6

सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांना खायला दाणे दिल्याने मनःशांती मिळते आणि असे केल्याने कुंडलीतील अशुभ फल देणारे ग्रहही शांत होतात. यासोबतच पहाटे पक्ष्यांना पाणीही देऊ शकता. मात्र, या काळात पक्ष्यांना स्वच्छ ठिकाणी अन्न आणि पाणी द्यावे हे लक्षात ठेवा.

2/6

पक्ष्यांना धान्य खायला देण्याव्यतिरिक्त, तुम्ही सकाळी उठून काळ्या मुंग्यांना पीठ किंवा साखर खाऊ देऊ शकता. काळ्या मुंग्यांना भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि त्यांना दररोज सकाळी पीठ खाऊ घातल्याने संकट दूर होते.

3/6

सकाळी उठल्यावर गाईचे दर्शन घेणे देखील खूप शुभ आहे. गाय ही लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानली जाते आणि तिच्या दर्शनाने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय तुम्ही स्वतःच्या हाताने गाईला भाकरी किंवा चारा खाऊ घालू शकता.

4/6

सकाळी लवकर धार्मिक पुस्तकांचे पठण करावे आणि हे शक्य नसेल तर किमान सकाळी उठून स्नान करून धार्मिक पुस्तकांचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. वेद आणि गीता सारखी धार्मिक पुस्तके पाहिल्याने तुम्हाला दिवसभर मानसिक उत्साही वाटेल.

5/6

शास्त्रानुसार असे मानले जाते की हातात भाग्याची रेषा असते आणि सकाळी उठल्याबरोबर दोन्ही तळवे पाहिल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. यामुळे मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

6/6

हिंदू धर्मग्रंथानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा करावी. असे केल्याने घरात सुख-शांती राहते आणि देवाची कृपा राहते. पूजेदरम्यान हवन आणि यज्ञही करावा. मात्र रोज हवन करणे शक्य नसेल तर तुळशीसमोर दिवा लावावा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)