Valentine's Day : प्रेमासाठी 'या' कलाकारांनी केली हद्द पार; कोणी रक्तानं लिहिलं पत्र, तर कोणी संपूर्ण शरीरावर काढले टॅटू

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेज ज्यांनी त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. या सेलिब्रिटींमध्ये आमिर खानपासून करीना कपूरपर्यंतच्या सगळ्यांचा समावेश आहे. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रेम मिळवण्यासाठी सगळ्या हद्द पार केल्या आहेत. 

Feb 14, 2023, 11:04 AM IST
1/5

Valentine s Day special celebrities

आमिर खानने केवळ पडद्यावर फक्त रोमँटिक भूमिका साकारल्या नाहीत. तो खऱ्या आयुष्यातही खूप रोमँटिक होता, म्हणूनच रिलेशनशिपमध्ये असताना आमिर त्याची पहिली पत्नी रीनाला रक्ताने प्रेमपत्र लिहायचा. दोघांनी गुपचूप लग्न केले होते पण लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

2/5

Valentine s Day special celebrities

दीपिका आणि रणबीर कपूर यांच्या विषयी देखील सगळ्यांना ठावूक आहे. दीपिकानं रणबीरवर असलेले प्रेम उघडपणे सांगण्यासाठी तिच्या मानेवर एक टॅटू देखील काढला होता. 

3/5

Valentine s Day special celebrities

करीना कपूरने शाहिद कपूर जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. करीना शाहिदच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिने त्याच्यासाठी मांसाहार कायमचा सोडून दिला. खरं तर, शाहिद शाकाहारी होता आणि त्यामुळे करीनानेही मांसाहार केला नाही. दोघांच्या ब्रेकअपने त्यांच्या चाहत्यांची मनं तुटली होती.

4/5

Valentine s Day special celebrities

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकाहाणी तर सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्टी माहितीये का हे त्यांचं दुसरं लग्न आहे. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी काय काय केले हे तुम्हाला ठावूक आहे का? त्यांनी लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. दोघांनी 1980 मध्ये लग्न केले होते. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. 

5/5

Valentine s Day special celebrities

आयटम गर्ल याना गुप्ता बॉयफ्रेंडच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिनं संपूर्ण शरीरावर त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती.