PHOTO : 9 वर्ष लहान तरुणाशी लग्न, Bollywood Director च्या पत्नीने लगावली कानशिलात, एका चुकीने उद्धवस्त झालं 'या' अभिनेत्रीचं करिअर

Entertainment :  फोटोमधील चिमुकली एकेकाळी बॉलिवूडमध्ये राज्य करायची आणि तिने राजकारणातही आपलं नशिब आजमावला. मात्र तिच्या एका चुकीने बॉलिवूडमधील करिअर उद्धवस्त झालं. 

Feb 04, 2024, 07:16 AM IST
1/12

1990 च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध तिच्या चित्रपटांसह खासही आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेत राहिली. 

2/12

या चिमुकलीने 1980 मध्ये ढाकोल या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली.

3/12

त्यानंतर 1981 कलियुग या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पण तिला खरी ओखळ मिळाली ती 1983 मधील मासूम या चित्रपटातून मिळाली. 

4/12

आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत ते तुम्हाला कळलं असेल. उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये कामं केलं. उर्मिला मातोंडकर पहिल्यांदा चाणक्य (1989) या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. 

5/12

त्यानंतर 1991 मध्ये आलेल्या नरसिंह चित्रपटातून तिने चाहत्यांची मनं जिंकली. तिने मराठी, हिंदी नाही तर तेलुगू, तामिळ, मल्याळम भाषेतही काम केलं. 

6/12

यानंतर उर्मिलाने बॉलिवूडला रंगीला, जुदाई, सत्य, कौन, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थीसह अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. 

7/12

रंगीला या चित्रपटातून उर्मिला रंगील गर्ल अशी ओळख मिळाली. उर्मिला आज तिचा 50 व्या वाढदिवस साजरा करत आहेत.

8/12

मीडिया रिपोर्टनुसार उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. ही चर्चा तेव्हा आणखी रंगली जेव्हा रामगोपाल यांनी एका चित्रपटातून माधुरी दीक्षितला काढून उर्मिलाला घेतलं. 

9/12

मीडिया रिपोर्टनुसार असही म्हणतात की, जेव्हा रामगोपाल वर्मा यांच्या पत्नीला या अफेअरबद्दल कळलं. तेव्हा तिने उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती. एवढंच नाही तर या घटनेनंतर रामगोपाल वर्माचा घटस्फोट झाला होता. शिवाय उर्मिलासोबतचं नातंही संपुष्टात आलं. 

10/12

2016 मध्ये उर्मिलाने 9 वर्ष लहान मोहसीन अख्तर मीरसोबत गुपचूप लग्न केलं. मनीष मल्होत्राने या दोघांची भेट करुन दिली. अख्तर हा काश्मिरचा एक बिझनेसमॅन आणि मॉडल आहे. 

11/12

2019 मध्ये उर्मिला काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत उतरली होती. पण भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांचा पराभव स्विकारावा लागला. 

12/12

त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात तिने काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. नंतर 2020 मध्ये उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला होता.