जळगावमधील येथील गरम पाण्याचा उनपदेव झरा अचानक बंद झाला

जळगावमधील अडावद येथे गरम पाण्याचा उनपदेव हा झरा आहे.  ऐन पावसाळ्यात हा झरा बंद झाला आहे. 

Aug 28, 2023, 23:21 PM IST

Jalgaon Unapdev Hot Water Spring : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथे प्रसिद्ध असे उनपदेव म्हणून पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी असलेल्या गोमुखातून कायम गरम पाणी वाहत असते. मात्र, हा गरम पाण्याचा झरा अचानक बंद झाला आहे. यामुळे पर्यटक नाराज झाले आहेत. 

1/5

या ठिकाणी आंघोळ केल्याने अनेक आजार दूर होतात अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी व गरम पाण्यात आंघोळ करण्यासाठी येत असतात.

2/5

महर्षी शरभंग कुष्ठरोगी असल्याने त्यांना रोगापासून मुक्त करण्यासाठी रामाने अग्निबाण जमिनीत रोवला. त्या वेळी जमिनीतून निघालेल्या जलधारेत स्नान केल्याने महर्षी कुष्ठरोगमुक्त झाले. ही जलधारा म्हणजेच सध्याचा उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा होय, अशी आख्यायिका आहे.

3/5

श्रीराम रावणाचा वध करून उनपदेव येथे शरभंग ऋषींच्या आश्रमात पोचले. ‘शरभंग त्रसदेह स्वर्ग गमनम’ असा या स्थळासंबंधीचा पुराणात उल्लेख असल्याचे जाणकार सांगतात.   

4/5

पर्यटन स्थळाच्या नावाखाली अनेक तरुण या ठिकाणी असणाऱ्या तलावात हुल्लडबाजी करत अत्यंत असभ्यवर्तन करताना दिसून येत आहे. या सर्वाचा या ठिकाणी येणाऱ्या भाविक महिलांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र कुठेतरी यावर प्रशासनाने लक्ष द्यावे असं म्हणत तरुणांच्या असभ्य वर्तनाचा महिला भाविकांनी निषेध केला आहे.

5/5

ऐन पावसाळ्यात या ठिकाणी गोमुखातून पडणारे गरम पाण्याचा झरा बंद झाल्याने भाविकांची मोठी निराशा झाली आहे.