ISRO चे दोन आंतराळवीर NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार; G20 परिषदेत PM मोदींसोबत करार

ISRO चे दोन आंतराळवीरांना NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) पाठवण्याबाबत भारत आणि अमेरिकेत महत्वाची चर्चा झाली आहे. 

Sep 12, 2023, 22:59 PM IST

International Space Station : G20 परिषदेत अमिरेका आणि भारत यांच्यात आंतराळ मोहिमेबाबत अत्यंत महत्वाचा करार झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन यांच्यात चर्चा झाली. ISRO च्या दोन आंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) जाण्याचा निर्णय झाला.

1/7

भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. यानंतर आता ISRO आंतराळ मोहिमेची तयारी करत आहे. 

2/7

अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन  स्थापन केले. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. 

3/7

ISRO गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेअंतर्गत भारत देश पहिल्यांदाच अंतराळात मानव पाठवणार आहे. यामुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाऊन आलेल्या भारतीय आंतराळवीरांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.   

4/7

 ISRO चे दोन आंतराळवीर काही काळ NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणार आहेत. दरम्यान तत्पूर्वी त्यांना ह्यूस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

5/7

G20 परिषदेत ISRO च्या आंतराळवीरांना NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्याबाबत भारत आणि अमेरिकेत महत्वाचा करार झाला.

6/7

भारतात पार पडलेल्या G20 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन यांच्यात चर्चा झाली.

7/7

2024 मध्ये भारतीय अंतरळा संस्था  ISRO चे दोन आंतराळवीर NASA च्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत.