...तर मी पुन्हा कधीच दिसलो नसतो; Olympic मधील 'त्या' Viral Shooter चं विधान चर्चेत

Turkish shooter Yusuf Dikec Paris Olympics: तो आला... त्याने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं काही... अशा शब्दांमध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या 51 वर्षीय नेमबाजाच्या कामगिरीचं वर्णन करता येईल. मात्र त्याने हे पदक जिंकल्यानंतर एक थक्क करणारं विधान केलं आहे. जाणून घेऊयात तो असं काय आणि कशासंदर्भात म्हणालाय...

| Aug 05, 2024, 14:19 PM IST
1/11

Turkish shooter Yusuf Dikec

ऑलिम्पिकमध्ये सामान्यपणे सुवर्णपद विजेत्यांची सर्वाधिक चर्चा असते. मात्र यंदाच्या पर्वामध्ये याला एक अपवाद ठरला आहे तो म्हणजे तुर्कीचा एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेक (Yusuf Dikec)! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डिकेकने त्याची साथीदार सेव्हल इलायदा तरहानसह (Sevval Ilayda Tarhan) 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. या सिलव्हर मेडलची जगभरात चर्चा होण्यामागील कारण ठरलं ते डिकेकचा या फेरीदरम्यानचा कूलनेस!

2/11

Turkish shooter Yusuf Dikec

तुर्कीमधील शूटरने जणू काही मॉर्निंग वॉकला आल्याप्रमाणे ट्राऊजर, व्हाइट कॉलरलेस टी-शर्ट अशा अवतारामध्ये साधा रोजच्या वापरातील चष्मा घालून आला. डावा हात खिशात टाकून उजव्या हाताने गोळ्या झाडत सहजपणे 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत रौप्यपदक जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या स्वॅगचा परिणाम असा झाला आहे की सध्या युसूफ डिकेक (Yusuf Dikec) हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होत असलेल्या व्यक्तींपैकी एक ठरला आहे.

3/11

Turkish shooter Yusuf Dikec

पदक जिंकल्यानंतर पुन्हा मायदेशी परल्यानंतर युसूफ डिकेकने त्याच्या सहकाऱ्याबरोबरच तुर्कीमधील अंदोलू या वृत्त संस्थेशी संवाद साधला. यावेळेस त्याला स्पर्धेदरम्यान असा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कोणत्याही अतिरिक्त गोष्टींचा वापर न करता का सहभागी झाला होता? अशा अर्थाचा प्रश्न विचारण्यात आला.

4/11

Turkish shooter Yusuf Dikec

ऑलिम्पिकमधील आपल्या गाजलेल्या लूकबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना युसूफ डिकेकने, "खरं तर मी ज्या पद्धतीने उभा होतो ती माझ्यासाठी सर्वात सोयीस्कर पोझिशन होती. त्या पोझिशनमध्ये माझं शरीर सर्वात स्थिर होतं," असं उत्तर दिलं. 

5/11

Turkish shooter Yusuf Dikec

पुढे बोलताना 51 वर्षीय युसूफ डिकेकने ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये पदकासाठी शेवटची फेरी खेळताना बाहेरुन मी जितका शांत आणि संयमी वाटत होता तितकाच गोंधळ माझ्या मनात सुरु होता असंही प्रांजळपणे मान्य केलं. "जरी मी बाहेरुन फार शांत वाटत होतो तरी माझ्या मनात वादळ सुरु होतं," असं युसूफ डिकेक म्हणाला.   

6/11

Turkish shooter Yusuf Dikec

आपल्या अशा लूकची एवढी चर्चा होईल असं कधी वाटलंही नव्हतं अशी कबुली त्याने दिली. "या लूकचा एवढा गवगवा होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता," असं सांगताना युसूफ डिकेकने आपल्याला सर्वात सोयीस्कर वाटेल अशी पोझिशन मी घेतली आणि शूट केलं, असा खुलासा केला. 

7/11

Turkish shooter Yusuf Dikec

अनेकांना ठाऊक नसेल पण युसूफ डिकेकचं हे पाचवं ऑलिम्पिक आहे. यापूर्वी त्याने 2008, 2012, 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे. युसूफ डिकेक हा 2001 पासून नेमबाजीमध्ये आहे.

8/11

Turkish shooter Yusuf Dikec

"अनेकदा लोक म्हणतात की तू एक हात खिशात ठेऊन पदक जिंकलं. पण ते सारं फक्त वर वर दिसणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे असं मला वाटतं. या पदकामागे माझी 24 वर्षांची मेहनत आहे. मी आठवड्यातील सहा दिवस रोज 4 ते 5 तास नेमबाजीचा सराव करतो," असं युसूफ डिकेकने सांगितलं.

9/11

Turkish shooter Yusuf Dikec

युसूफ डिकेकने यापूर्वी युरोपीयन चॅम्पियनशीप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये पदकं पटकावली आहेत. त्याने मेडटेरियन गेम्स तसेच इस्लामिक सॉलिडॅरिटी गेम्समध्येही अनेक पदकं कमावली आहेत. "त्या कलेक्शनमध्ये ऑलिम्पिक पदक नव्हतं. जर हे रौप्यऐवजी सुवर्णपदक असतं तर ते कलेक्शन पूर्ण झालं असतं," असं युसूफ डिकेकने म्हटलं.

10/11

Turkish shooter Yusuf Dikec

विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं असतं तर यानंतर आपण पुन्हा कधी शुटींग रेंजवर दिसलो नसतो असंही जगभरामध्ये चर्चेत असलेल्या युसूफ डिकेकने स्पष्ट केलं. 

11/11

Turkish shooter Yusuf Dikec

"या ऑलिम्पिकमध्ये मला सुवर्णपदक मिळालं असतं तर मी नेमबाजीमधून निवृ्त्त होण्याचा विचार केला होता. सध्या मी उत्तम कामगिरी करतोय. देवाच्या मनात असेल तर आम्ही पुढल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच 2028 मध्ये नक्कीच सुवर्णपदक जिंकू," असा विश्वास युसूफ डिकेकने व्यक्त केला.