एकाचवेळी चालत फिरता येतील 17 देश; फक्त 'एवढं करावं लागेल

Travel Facts : तुम्हीही असेच फिरस्तीचे शौकिन आहात का? नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला तुम्हालाही आवडतं का? मग ही गंमत तुमच्यासाठी. कारण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण, तुम्ही जगातील बऱ्याच ठिकाणांवर फुकटात फिरू शकता. हो हे खरंय... 

Nov 23, 2023, 14:51 PM IST

Travel Facts : प्रवास... एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा, एखादा अनुभव घेण्यासाठीचा, एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठीचा आणि स्वत:ला समृद्ध करण्यासाठीचा हा प्रवास. तो सर्वांनाच हवासा वाटतो. किंबहुना तो सर्वांच्याच आवडीचाही असतो. पण, कधी? तर जेव्हा कशाचीही बंधनं नसतात, अपेक्षांचं ओझं नसतं... असते ती फक्त मनसोक्त भटकण्याची इच्छा. 

1/8

पायी ओलांडता येईल असा रस्ता

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

प्रवासासाठी एकही रुपया खर्च न करता, कोणत्याही रेल्वे, बसचं तिकीट न काढता पायी पायी जात तुम्ही चक्क 17 देश ओलांडू शकता. इथं तुमची साथ देईल जगातला सर्वात मोडा पायी ओलांडता येईल असा रस्ता. (World Longest Walkable Road) 

2/8

केप टाऊन ते रशियाच्या

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) केप टाऊन ते रशियाच्या (Russia) मगदान पर्यंतचं अंतर म्हणजेच हा जगाजला पायी प्रवासासाठीचा लांबलचक रस्ता. ही वाट सर करत असताना तुम्ही अनेक रस्ते आणि पूल ओलांडता.  आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या सुएझ (suez) कालव्यापासून ही वाट पुढे जाते. ज्यानंतर तुर्की आणि मध्य आशिया ओलांडून सायबेरीया पार करत मग मगदानमध्ये पोहोचता. Brilliantmaps नुसार हे अंतर 22387 किलोमीटर इतकं आहे जे ओलांडण्यासाठी तब्बल 4492 तासांचा वेळ लागू शकतो.   

3/8

4263 तासांचा वेळ

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

Google Maps हेच अंतर 21550 किमी असल्याचं दाखवतो. जे ओलांडण्यासाठी अंदाजे 4263 तासांचा वेळ लागतो. तासांच्या या गणिताची फोड केल्यास या प्रवासासाठी 180 ते 190 दिवसांचा कालावधी लागतो. इतकंच नव्हे, हा प्रवास तुम्हाला 17 देश ओलांडण्याची संधी देतो.   

4/8

17 देश, सहा Time Zone

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

17 देश, सहा Time Zone, सातत्यानं बदलणारे तीन ऋतू आणि हवामानासह असंख्य भौगोलिक बदल तुम्ही या प्रवासादरम्यान अनुभवू शकता. दर दिवशी ओढाताण न करता, किमान 8 तासांसाठी चाललं तर तुम्ही हा प्रवास 562 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता.   

5/8

टेबल माऊंटन नॅशनल पार्क

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

या प्रवासाची सुरुवात केप टाऊनच्या टेबल माऊंटन नॅशनल पार्क (Table Mountain National Park) पासून होते. पुढे बोस्टवानामध्ये असताना तुम्ही Chobe National Park आणि Okavango Delta या दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये अवाढव्य हत्ती, सिंह, जिराफ, झेब्रा असे वन्य पाहू शकता. 

6/8

व्हिक्टोरिया फॉल

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

झाम्बिया आणि झिम्बाब्वेच्या सीमाभागात पोहोचलं असता झाम्बेझी नदीपाशी असणारा Victoria Fall तुमची नजर खिळवून ठेवतो.  नक्कीच पाहू शकता. वाट मागे सरते आणि 14000 मैलांचा प्रवास पूर्ण होताच तुम्ही इजिप्तमध्ये पोहोचता. 

7/8

जॉर्डन

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

पुढच्या टप्प्यात जॉर्डनमधून जाताना तुम्ही Al-Khazneh (The Treasury) Temple या पेत्रा येथील स्थळाला भेट देऊ शकता. तुर्कीच्या  Lake Van परिसरातून जाण्याचा पर्यायही तुमच्यातडे असो. तिथून Armenian Kingdoms पासून प्रवास पुढे सुरु ठेवा. 

8/8

अखेरचा टप्पा

travel interesting fact longest road in the world that which can be cross by foot photos

प्रवासाचा अखेरचा टप्पा असतो जॉर्जिया. इथं Tbilisi शहराला नक्की भेट देऊन या शहराच्या स्थापत्यशास्त्रानं भारावून शेवटी तुम्ही रशियात (Russia) पोहोचता आणि रशियात एक प्रवास संपून तुम्ही जगाच्या दुसऱ्या टोकावर आल्याची जाणीव होते.