ऑक्टोबरमध्ये फिरायचा प्लॅन करताय? 'या' 5 भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या!

Top 5 best Places To Visit : ऑक्टोबरमध्ये तुम्हीही फिरण्यासाठी उत्सुक असाल तर या पाच ठिकाणांना नक्की भेट द्या.

Oct 01, 2023, 22:20 PM IST

Places To Visit In October In India : उन्हाळ्यानंतर फिरण्यासाठी सर्वात फेवरेट महिना म्हणजे ऑक्टोबर... सण-उत्सव संपल्यानंतर आणि दिवाळीच्या आधी अनेकजण भटकंतीची तयारी करतात. 

1/7

ऑक्टोबर

ऑक्टोबर महिना प्रवासासाठी योग्य मानला जातो. या महिन्यात, चांगल्या हवामानाबरोबरच अनेक सुट्ट्या देखील आहेत. त्यामुळे तुम्हीही बॅगा भरा अन् फिरायला निघा.

2/7

हम्पी

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये कर्नाटकातील हम्पी शहराचं नावही नोंदवलं गेलं आहे. हे शहर प्राचीन मंदिरे, स्मारके आणि अखंड रचनांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ज्यांना ऐतिहासिक वास्तू पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी हंपी हे एक योग्य ठिकाण आहे.

3/7

आग्रा

यमुना नदीच्या काठावर बांधलेल्या ताजमहालचे नाव जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाच्या यादीत असायलाच हवं. ताजमहाल व्यतिरिक्त, तुम्ही आग्रा किल्ला, जामा मशीद, मेहताब बाग, अकबराचा मकबरा (सिकंदरा), फतेहपूर सिक्रीलाही भेट देऊ शकता.

4/7

कोलकाता

ऑक्टोबर महिन्यात कोलकातामध्ये दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तुम्ही निक्को पार्क, व्हिक्टोरिया मेमोरियल, कालीघाटातील कालका मंदिर आणि बेलूर मठ यासारख्या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता.

5/7

ऋषिकेश

गंगा नदीच्या काठावर बसून थंड हवेचा आनंद घेयचा असेल तर तुम्ही ऋषिकेश या ठिकाणी भेट देऊ शकता. इथं  नीळकंठ महादेव मंदिर, राम झुला, लक्ष्मण झुला, जानकी पूल, नीर गड धबधबा, ऋषीकुंड, स्वर्ग आश्रम, बीटल्स आश्रम आणि त्रिवेणी घाट ही येथील आकर्षणाची केंद्रे आहेत.

6/7

दार्जिलिंग

दार्जिलिंग हे ठिकाण भारतातील सर्वोच्च हिल स्टेशन आहे. तुम्ही पद्मजा नायडू पार्क, प्राणीशास्त्र उद्यान, रॉक गार्डन, पीस पॅगोडा, टायगर हिल, घूम मठ, सेंट अँड्र्यू चर्च आणि सिंगलिला नॅशनल पार्क पाहू शकता.

7/7

केरळ

केरळला ‘गार्डन ऑफ स्पाइसेस ऑफ इंडिया’ म्हटले जाते. म्ही केरळला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला येथे मुन्नारपासून अलेप्पी, कोची, वायनाड आणि त्रिशूरपर्यंत भेट देण्याची ठिकाणे सापडतील.