समुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज?

Titanic news: टायटॅनिकचे अवशेष आजही संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय आहेत. हेच कुतूहल आणि जहाजाप्रतीची ओढ पाहता एका धनाढ्य व्यक्तीनं टायटॅनिक 2 हे जहाज समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 15, 2024, 15:42 PM IST

Titanic news: टायटॅनिक हे जहाज 1912 मध्ये पहिल्या प्रवासाला निघालं, याच प्रवासामध्ये या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि शेकडो प्रवाशांना घेऊन हे महाकाय जहाज पहिल्याच प्रवासात समुद्राच्या उदरात सामावून गेलं. 

1/7

टायटॅनिक 2

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

पहिल्या प्रवासाच जे टायटॅनिक जगापासून दुरावलं जे आता नव्या रुपात पुन्हा समोर येणार आहे. 4.2 अब्ज डॉलरची संपत्ती असणाऱ्या क्लाईव पामर यांनी 2012 आणि 2018 मध्ये टायटॅनिक 2 चा प्रकल्प सर्वांसमोर आणला होता. काही कारणास्तव सुरुवातीला तो टळला, पण आता पामर यांनी सिडनीतील ओपेरा हाऊस येथे आजोयित एका कार्यक्रमात त्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टमधील बदलांची माहिती दिली.   

2/7

प्रेमाचं प्रतीक

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

प्रेमाचं प्रतीक आणि आलिशान शैलीचं प्रतीक असणारं हे जहाज समुद्रात उतरणारच असं, पामर यांनी स्पष्ट केलं. 

3/7

जहाजाचे अंतरंग

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

पामर यांच्या माहितीनुसार जहाजाचा मूळ भाग पूर्वीच्याच टायटॅनिकसमान असणार आहे. ज्यामध्ये बॉलरूम, स्विमिंग पूल, टर्किश न्हाणीघर असणार आहे. 

4/7

ब्लू स्टार लाईन कंपनी

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

पामर यांच्या ब्लू स्टार लाईन कंपनीकडून टायटॅनिक 2 साठीचं काम हाती घेण्यात आलं असून, जून 2027 मध्ये ती समुद्री लाटांवर स्वार होण्यासाठी सज्ज असेल. साउथेम्प्टन ते न्यूयॉर्क असा या जहाजाचा पहिला प्रवास असेल. 

5/7

प्रवासी क्षमता

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

269 मीटर लांबी आणि साधारण 32.2 मीटरहून अधिक रुंदी असणाऱ्या या जहाजामध्ये 835 केबिन असणारे 9 डेक असून त्यांची प्रवासी क्षमता असणार आहे 2345.   

6/7

श्रेणीमध्ये विभागणी

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

नव्या टायटॅनिकमध्ये निम्मे केबिन प्रथम श्रेणी प्रवाशांसाठी आरक्षित असतील. तृतीय श्रेणी प्रवाशांना इथं लांबलचक मेसमध्ये जेवण वाढलं जाईल.   

7/7

एकूण खर्च

titanic ii huge cruise ship will sail in deep sea latest photos

टायटॅनिक या  56,000 टन वजनाच्या जहाजाच्या निर्मितीसाठी साधारण 1 अब्ज डॉलरहून अधिक खर्च येणार आहे. पण, मुळात ऑस्ट्रेलियन अब्जाधिश पामर यांनाच हे जहाज पुन्हा नव्यानं उभारण्यामध्ये रस असल्यामुळंच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे.