Lehenga Buying Tips : लग्नातील कार्यक्रमांसाठी Budget मध्ये खरेदी करायचाय लेहेंगा, मग या टिप्स करा फॉलो

आजकाल लग्नाचा प्रत्येक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. मग त्यात मेहंदी असो, संगीत असो किंवा मग हळद सगळ्याच कार्यक्रमांचा थाटचं वेगळा असतो. इतकंच काय तर या कार्यक्रमांमध्ये आजकाल थीम देखील ठरवली जाते. त्या थीमप्रमाणे लोक कपडे परिधान करतात. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते कपडे. त्यात जर नवरी असेल तर तिच्या कपड्यांची तर खास काळजी घेतली जाते. आज आपण बजेटमध्ये चांगले लेहेंग कसे घ्यायचे आणि त्यासोबत लेहेंगा घेताना कसे घ्यायला हवे याविषयी जाणून घेऊया...

| Jun 07, 2023, 18:36 PM IST

Tips for Lehenga Buying : आजकाल लग्नाचा प्रत्येक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. मग त्यात मेहंदी असो, संगीत असो किंवा मग हळद सगळ्याच कार्यक्रमांचा थाटचं वेगळा असतो. इतकंच काय तर या कार्यक्रमांमध्ये आजकाल थीम देखील ठरवली जाते. त्या थीमप्रमाणे लोक कपडे परिधान करतात. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते कपडे. त्यात जर नवरी असेल तर तिच्या कपड्यांची तर खास काळजी घेतली जाते. आज आपण बजेटमध्ये चांगले लेहेंग कसे घ्यायचे आणि त्यासोबत लेहेंगा घेताना कसे घ्यायला हवे याविषयी जाणून घेऊया...

1/7

आज काल काय असते कार्यक्रमांप्रमाणे ट्रेन्ड

Tips for Lehenga Buying

मेहेंदीसाठी हिरवा रंग, हळदीसाठी पिवळा रंग हे तर कॉमन रंग आहेत. त्यातही रिसेप्शन आणि संगीतच्या कार्यक्रमांसाठी आपल्याला हवे ते रंग निवडतात. 

2/7

लेहेंगा निवडता कोणत्या प्रकारचा घ्यावा

Tips for Lehenga Buying

कमी बजेटमध्ये ड्रेस हवा असेल तर हेवी वर्कवाला लेहेंगा न निवडता प्रिंटेड लेहेंगा निवडा. त्यासोबतच चिकनकारी किंवा सिल्कचा लेहेंगा निवडा. हे फक्त दिसायला सुंदर दिसणार नाही तर खिशाला परवडणारे आहेत. 

3/7

कसा तपासाल लेहेंगा

Tips for Lehenga Buying

लेहेंगा घेताना तो वेगवेगळ्या लाइटमध्ये तपासून पाहा. फक्त दुकानात नाही तर दुकानाच्या बाहेर जाऊन नॅच्युरल प्रकाशात जाऊन बघा. कारण नॅच्युरल लाइटमध्ये लेहेंग्याचा वेगळा रंग दिसतो. 

4/7

बजेट फ्रेंडली लेहेंगा

Tips for Lehenga Buying

तुम्हाला बजेट फ्रेंडली लेहेंगा हवा असेल तर ऑनलाइन खरेदी करण्याचा विचार करा. चांगल्या वेबसाइटवरून लेहेंगा खरेदी करा. 

5/7

ऑनलाइन घेताना घ्या ही काळजी

Tips for Lehenga Buying

ऑनलाइन वेबसाइटवर लेहेंगा खरेदी करत असताना सगळ्यात आधी तुम्ही त्या खाली असलेली रिव्ह्यू वाचा. 

6/7

ऑनलाइन लेहेंगा घेतल्यास मिळतो डिस्काऊंट

Tips for Lehenga Buying

अनेकदा आपल्याला डिस्काऊंट देखील मिळतो त्याकडे लक्ष द्या. त्यानं कमी किंमतीत तुम्हाला लेहेंगा मिळेल.

7/7

सेलिब्रिटी लूक करण्याचा विचार सोडा

Tips for Lehenga Buying

सेलिब्रिटी लूक करण्याच्या प्रयत्नात पडू नका. त्यांच्यासारख्या लेहेंग्याची मागणी जास्त असल्यानं ते जास्त महागही असतात. (All Photo Credit : Pexels)