Car Under 6 Lakhs: मध्यवर्गीयांसाठी सर्वोत्तम कार! किंमत 6 लाखांहून कमी; सेफ्टीत 4 स्टार, मायलेज 26 kmpl+

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety: मायलेज आणि सुरक्षा या दोन्ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या ज्या कारबद्दल आपण बोलतोय ती कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक उत्तम फर्स्ट कार ठरु शकते. या कार्सचे नेमके फिचर्स काय आहेत? तिची किंमत किती आहे आणि ती एवढी लोकप्रिय का आहे जाणून घेऊयात...

| Mar 09, 2024, 16:24 PM IST
1/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

भारतातील मध्यवर्गीय कुटुंब जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करतं त्यावेळेस गाडी किती मायलेज देते आणि तिच्या देखरेखीसाठी किती खर्च येईल या दोन गोष्टींचा विचार सर्वात आधी केला जातो. 

2/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

याच दोन गोष्टींचा विचार करणारी भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणजे मारुती सुझूकी. भरतीय ग्राहकांमध्ये मारुती सुझूकीच्या अनेक गाड्या प्रचंड लोकप्रिय आहेत. खास करुन 5 ते 6 लाखांच्या रेंजमध्ये येणाऱ्या अनेक गाड्या हातोहात विकल्या जातात.  

3/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

मात्र या कंपनीच्या गाड्यांना टक्कर देणाऱ्या कार्स मागील काही वर्षांमध्ये एका कंपनीकडून सातत्याने बाजारात उतरवल्या जात आहेत. ही कंपनी आहे टाटा. सध्या टाटाकडेही 5 लाखांपासून सुरु होणाऱ्या रेंजमधील अनेक कार्स आहेत. मात्र त्यातही टाटाकडे एक अशी कार आहे ही मायलेज आणि सुरक्षेमध्ये अनेक स्पर्धक गाड्यांना मागे टाकू शकते. याच कारबद्दल जाणून घेऊयात...  

4/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

मायलेज आणि सुरक्षा या दोन्ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या ज्या कारबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे टाटा टियागो! मारुती ऑल्टो, एस-प्रेसो, सेलेरियो आणि वॅगनारसारख्या कार्सला ही कार तगडं आव्हान देताना दिसत आहे.

5/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

टाटा टियागोचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या कारला असलेलं सेफ्टी रेटींग. भारतीय ग्राहकांकडून आता कार विकत घेताना ती किती सुरक्षित आहे याचा दिलं जाणारं महत्त्व वाढताना दिसतंय. मात्र बजेट कार्सच्या सेगमेंटमध्ये कारच्या सुरक्षेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.

6/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

मात्र टाटा टियागो याला अपवाद आहे असं म्हणता येईल. यामागील मुख्य कारण म्हणजे टाटा टियागोची बिल्ड क्वॉलिटी उत्तम असून एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये कारला 4 स्टार मिळाले आहेत.  

7/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

टाटा टियागोमध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळतं. हे इंजिन 86 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करतं. विशेष म्हणजे ही कार सीएनजी पर्यायामध्येही उपलब्ध आहे.  

8/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

टाटा टियागोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गेअर बॉक्सचा पर्याय मिळतो.  

9/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

मायलेजबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या दाव्यानुसार टाटा टियागोचं पेट्रोल व्हर्जन 19.01 किलोमीटर प्रती लिटरचं एव्हरेज देतं. तर एका किलो सीएनजीमध्ये ही कार 26.49 किलोमीटर धावू शकते.  

10/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

टाटा टियागोमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. एलईडी डीआरएलबरोबरच प्रोजेक्टर हेडलाइट्स, रेअर डिफॉगर आणि बॅक वायफर्ससारखे फिचर्स कारमध्ये आहेत.  

11/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

तसेच टाटा टियागोमध्ये 8 स्पीकर साऊंड सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोवबॉक्ससारखे फिचर्सही आहेत.  

12/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युएल फ्रंट एअर बॅग देण्यात आल्या आहेत. रेअर पार्किंग सेन्सर्स, ईबीडीबरोबर एबीएस आणि कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल सपोर्ट देण्यात आला आहे.  

13/13

Car Under 6 Lakhs With Good Mileage And Safety

टाटा टियागो बाजारामध्ये 5.65 लाख रुपयांपासून 8.90 लाख रुपयांपर्यंत (दोन्ही एक्स-शोरुम प्राइज) उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही बजेट आणि सुरक्षित कार शोधत असाल तर टाटा टियागो हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.