Weight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल

Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते

Jan 30, 2023, 11:49 AM IST

Weight Loss Tips : हल्लीची जीवनशैली पाहता प्रत्येकजण आपल्या राहणीमानात काही सकारात्मक बदल करु पाहत आहे. पण हे बदल करत असताना अनेकांचाच कल हा तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा सोशल मीडियावरून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांकडे जास्त दिसून येतो. 

1/6

Weight Loss tips

things not to do in Weight Loss journey read details

अनेकांचाच अट्टहास आणि प्रयत्न असतो तो म्हणजे वजन कमी करण्यावर. आम्हाला सुदृढ व्हायचंय याऐवजी अनेकजण आम्हाला बारीक व्हायचंय हाच सूर आळवतात. (things not to do in Weight Loss journey read details )

2/6

Weight Loss

things not to do in Weight Loss journey read details

हे सर्व करत असताना मग अजाणतेपणे काही अशा चुका घडतात, ज्या भविष्यात महागातही पडू शकतात. अशीच एक चूक म्हणजे आहारातून Carbohydrates बंद करणं. भात, पोहे, चपाती, उपमा असे पदार्थ न खाल्ल्यास तुम्हाला थकवा जाणवेल, शरीराला आवश्यक उर्जाही मिळणार नाही.   

3/6

Weight Loss exercise

things not to do in Weight Loss journey read details

हल्ली व्यायामाचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. पण, आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा व्यायाम पूरक आहे हेच ठरवण्यात चुका होत असल्यामुळं पुढे याचा मोठा फटका बसतो. त्यामुळं व्यायाम निवडण्यात चूक करू नका. 

4/6

Weight Loss fasting

things not to do in Weight Loss journey read details

अनेकदा उपवास ठेवण्याचं तंत्र आजमावत काही मंडळी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण, जेव्हा प्रचंड भूक लागते तेव्हा मात्र बेसुमार गोष्टी खाऊन शरीराचं चक्रच बिघडवतात. ही सवय अजिबातच योग्य नाही.   

5/6

Weight Loss diet

things not to do in Weight Loss journey read details

फक्त Proteins च्याच सेवनाला अनेकजण यादरम्यान प्राधान्य देतात. यावेळी काही गोष्टींची आवश्यकता असूनही शरीरात त्यांची पूर्तता होत नाही, ही सवय पुढे जाऊन महागात पडू शकते. 

6/6

Weight Loss journey

things not to do in Weight Loss journey read details

थोडक्यात, वजन कमी करण्यात गैर काहीच नाही, पण ते करण्यापूर्वी आपलं शरीर, आपल्या गरजा आणि आपली भूक या साऱ्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणं कधीही उत्तम.