भारतीय रेल्वेमध्ये महिलांना मिळतात 'या' 7 खास सुविधा, तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय रेल्वेमध्ये महिलांसाठी काही खास सुविधा दिल्या आहेत. तुम्हाला माहिती आहेत का त्या सुविधा. नसेल तर जाणून घ्या सविस्तर

| Oct 17, 2024, 16:20 PM IST
1/7

50% सवलत

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, 60 वर्षांवरील महिलांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकिटामध्ये 50% सवलत मिळते. 

2/7

आरक्षित जागा

रेल्वेमध्ये काही सीट हे महिलांसाठी आरक्षित असतात. ज्यामध्ये गर्दीच्या वेळी महिला या सीटवर बसून सुरक्षित प्रवास करू शकतात. 

3/7

तिकीट

रेल्वेच्या नियमानुसार एखाद्या महिलेकडे तिकीट नसेल किंवा त्या महिलेचे तिकीट हरवले असेल तर टीटीई त्या महिलेला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.

4/7

लोअर बर्थ

त्यासोबत ज्या महिलांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आहे. अशा महिलांना लोअर बर्थचे टिकीट दिले जाते. ज्यामुळे त्या महिलेला आरामात प्रवास करता यावा. 

5/7

बर्थ एक्सचेंज

ज्या महिला प्रेग्नेंट आहे. त्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना विचारून त्यांची मधली किंवा वरची सीट खालच्या बर्थसाठी बदलू शकतात.   

6/7

तिकीट काउंटर

रेल्वे स्टेशनवर महिला काउंटर नसेल तर महिला जनरल काउंटरवर जाऊन कोणत्याही रांगेत न उभे राहता तिकीट बुक करू शकतात. 

7/7

स्पेशल डब्बा

लोकल किंवा ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगळा डब्बा असून त्यामध्ये फक्त महिलाच प्रवास करू शकतात.