स्मशानात असलेले भारतातील सर्वात 'लकी' रेस्टॉरंट; कबरींच्या मध्ये आहेत टेबल

अहमदाबाद येथील लकी रेस्टॉरंट हे स्माशानात आहे. या रेस्टॉरंटमध्ये टेबलांच्या आजूबाजूला सर्व कबरी  आहेत. 

Aug 16, 2023, 19:44 PM IST

Lucky Restaurant In Ahmedabad : भारतात छोट्याशा चहाच्या स्टॉल पासून मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत. येथील खाद्य पदार्थांची टेस्ट तसेच विविध कारणांमुळे हे  रेस्टॉरंट प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतात एक असे रेस्टॉरंट आहे जे वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहे. अहमदाबाद असलेले हे रेस्टॉरंट स्माशानात आहे. लकी रेस्टॉरंट असे याचे नाव आहे. 

 

 

1/7

अहमदाबाद येथील लकी रेस्टॉरंट हे भारतातील सर्वात डेंजर  रेस्टॉरंट आहे. 

2/7

लकी रेस्टॉरंट हे स्माशानात आहे. येथे दफन करण्यात आलेल्या कबरींच्या आजूबाजूलाच टेबल आणि खुर्च्या आहेत. 

3/7

लकी रेस्टॉरंट मध्ये येणारे लोक कबरींसोबत बसूनच चहा, कॉफी तसेच इतर खाद्यापदार्थांचा आस्वाद घेतात. 

4/7

अनेकांना हे रेस्टॉरंट नावाप्रमाणे  लकी वाटते. महत्वाचे काम असेल तर येथे आल्यावर त्या कामात यश येते असे काही लोक मानतात. येथे आल्यावर मानसिक शांती मिळते असेही अनेकांना वाटते. 

5/7

1950 मध्ये केएच मोहम्मद यांनी मुस्लिम कब्रिस्तान बाहेर एक छोटासा स्टॉल सुरु केला होता. 

6/7

दिवसेंदिवस या रेस्टॉरंटची लोकप्रियता वाढत गेली. स्मशानातच कबरींभोवती टेबल खुर्च्या टाकण्यात आल्या.  

7/7

लकी रेस्टॉरंटमध्ये एकूण 26 कबरी आहेत. या कबरी 73 वर्ष जुन्या आहेत. येथे रोज कंबरींवर जाती फुलं अर्पण केली जातात.