तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांच्या एका Kiss मुळे उद्धवस्त झालं 'या' राजकुमारीचं आयुष्य, कारण...

The Crown : प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या वैवाहित नात्यात फार सुरुवातीपासूनच तणाव होता. अखेर शाही कुटुंबातील नियमांना झुगारून यो जोडीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि डायना हे नाव ब्रिटनच्या शाही कुटुंबापासून वेगळं झालं. 

Nov 22, 2023, 15:06 PM IST

Princes Diana : काहीजणांच्या जीवनात सर्व सुखसोयी असतात, पैसा, श्रीमंती सर्वकाही असतं. पण, प्रेम आणि आपलेपणापासून मात्र ही मंडळी वंचित असतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे प्रिन्सेस डायना. ब्रिटनचे तत्कालीन राजकुमार आणि सध्याचे राजे चार्ल्स यांच्या या पहिल्या पत्नी. 

1/9

सर्वसामान्यांमध्ये असणारी ओळख

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

राजघराण्याशी असणारी सर्व औपचारिक नाती तुटली तरीही डायनाची सर्वसामान्यांमध्ये असणारी ओळख मात्र कायम होती. उलटपक्षी तिला अनेकांचीच सहानुभूती मिळाली. याचदरम्यान डायनाचं खासगी आयुष्य या न त्या कारणामुळं चर्चेत येत राहिलं.   

2/9

प्रिन्सेस डायना

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

1985-86 पासूनच डायनाचं नाव अनेक पुरुषांशी जोडलं गेलं. यामध्ये ऑफिसर बॅरी, कमांडर जेम्स हॅविट, बालमित्र जेम्स गिल्बे, ऑलिवर होएरे, रग्बी प्लेयर विल, पाकिस्तानी डॉक्टर हसनत खान यांचा समावेश होता. पण, डोडी फायद हेच नाव डायनाशी अखेरच्या क्षणापर्यंत कायम जोडलं गेलं. डोडी म्हणजे 'चेरियट्स ऑफ फायर' (1981) चा निर्माता. 

3/9

डायना आणि डोडी

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

मोहम्मद अल फायद या तत्कालीन धनाढ्य व्यावसायिकाचा मुलगा, डोडी. 1997 दरम्यान डायना आणि डोडी यांची ओळख झाली. प्रिन्स विलियम आणि हॅरी यांच्यासह डायना मोहम्मद अल फायद याच्या क्रुजवर सुट्टीसाठी गेली आणि ती परतली तेव्हा डोडीनं तिच्यासाठी काही खास भेटवस्तूंचा बेत आखला होता.   

4/9

समाजसेवी कामांना प्राधान्य

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

तिथं एक नातं बहरत असतानाच डायना मात्र तिच्या समाजसेवी कामांनाही प्राधान्य देत होती. इलेक्ट्रॉनिक क्रांतीच्याच काळात हे सर्वकाही घडत असताना ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंतसुद्धा याबाबतची माहिती पोहोचत होती.   

5/9

खासगी फोटो टीपला

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

डायनाच्या फोटोंची कायमच होणारी चर्चा पाहता तिच्या खासगी आयुष्यातही पापाराझी डोकावू लागले होते. इतके की, डायनाला श्वास घेणंही अवघड झालं होतं. याच पापाराझींनी डायना आणि डोडीचा एक खासगी फोटो टीपला. फोटोग्राफर मारियो ब्रेनानं डायना आणि डोडीचा एक फोटो टीपण्यात यशस्वी ठरला होता जिथं ते एकमेकांना किस करताना दिसले.   

6/9

'द किस'

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

'द किस' नावानं हा फोटो तेव्हाच्या सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकला आणि बोली लावली तेव्हा या फोटोला 250 पाऊंड म्हणजेच 2,60,74,275 रुपये इतकी किंमत मोजली गेली. पुढं काही वर्तमानपत्रांनी हा फोटो 100 हजार पाउंड्सना विकत घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या छायाचित्रकारानं हा फोटो टीपला होता त्याला 1 मिलियन पाउंड्सहून जास्त रक्कम मिळाली होती. याच क्षणापासून डायना आणि डोडी जातील तिथं पापाराझी घोळक्यानं त्यांचा पाठलाग करत होते.   

7/9

रात्रीच्या मुक्कामानंतर...

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

याचदरम्यान 30 ऑगस्ट 1997 ला डायना आणि डोडी त्यांच्या 'योनिकल' क्रूझवरून निघाले आणि पॅरिसला गेले. एका रात्रीच्या मुक्कामानंतर त्यांना लंडनला जायचं होतं. पण, तिथून निघतेवेळीच त्यांना पुन्हा पापाराझींनी गाठलं.   

8/9

डायनाला सारं जग मुकलं

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

हा घोळका चुकवण्यासाठी म्हणून डायना आणि डोडीच्या वाहनचालकानं वेग वाढवला आणि भरधाव वेगात असणारी त्यांची कार अंडरपासमध्ये नियंत्रणाबाहेर गेली. हा अपघात इतका मोठा होता की, डोडी फायदनं घटनास्थळीच प्राण गमावले. डायनाला रुग्णालयात नेण्यात आलं पण, तिला वाचवण्यात डॉक्टरांनाही अपयश आलं आणि डायनाला सारं जग मुकलं.   

9/9

निरोप...

The Crown princess diana dodi fayed kiss affair photos

पुढे डायना आणि डोडी यांच्या अपघाती निधनानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. डायनाची लोकप्रियता इतकी होती की तिला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता.