ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट
Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
Thane To Borivali Underground Subway:या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शएकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 22 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
1/13
ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गाला मिळाली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी
Thane and Borivali twin Tunnel Project: मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासांची बचत होणार आहे.
2/13
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
3/13
प्रकल्प कसा असेल?
4/13
आपत्कालीन मार्ग
5/13
चार टनल बोरिंग मशिन
6/13
वायुविजन प्रणाली
7/13
एकूण 3 पॅकेजेस मध्ये विभागला
8/13
प्रकल्पाचे फायदे
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि पूर्वेकडील ठाणे जिल्ह्याला जोडणारा सुमारे हा 12 किमीचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. ज्यामध्ये प्रदेशाची वाहतूक व्यवस्था सुधारून पर्यावरणीय स्थैर्य राखत नागरीकांचे जीवन आणखीन सुसह्य करण्याची क्षमता आहे.
9/13
महत्त्वपूर्ण कॉरिडॉर
या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व-पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग 3 आणि 8 मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर म्हणून कार्यरत राहील. सद्यःस्थितीत ठाणे ते बोरिवली दरम्यान घोडबंदर मार्ग 23 किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी (peak hours) एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो.
10/13
पर्यावरणाचे संवर्धन
11/13
महत्त्वपूर्ण टप्पा साध्य
12/13