Plastic Rocks पाहून वैज्ञानिक हादरले! 'हे' दगड देत आहेत धोक्याचा इशारा; पाहा Photos

Plastic Rocks Found On Remote Island: संशोधकांना दूरवरील एका छोट्याश्या बेटावर सापडलेले मोरपीसी आणि काळ्या रंगाचे दगड धोक्याचा इशारा देत आहेत. संशोधकांनी या दगडांसंदर्भातील भीती व्यक्त करताना त्यामधून काय सुचित होत आहे यासंदर्भातील भाष्य केलं आहे. नेमकं हे प्लास्टिक दगड प्रकरण काय आहे आणि त्यामुळे संशोधक का घाबरलेत जाणून घेऊयात...

Mar 17, 2023, 18:54 PM IST
1/7

Plastic Rocks

ब्राझीलवमधील त्रिनडेड बेटांवरील निसर्ग हा कायमच संसोधकांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. मुळात हे एक ज्वालामखीवर वसलेलं बेट आहे. त्यामुळे येथील माती आणि खडकांचे नमुने तपासण्यासाठी अनेक संशोधक या बेटांना भेटी देत असतात. नुकतेच वैज्ञानिकांना या बेटावर प्लास्टिकचे दगड आढळून आले आहेत. 

2/7

Plastic Rocks

खरं तर हे दगड प्लास्टिक वितळून नैसर्गिक दगडांबरोबर एकत्र झाल्याने तयार झाले आहेत. दगड आणि वितळलेल्या प्लास्टिकच्या एकत्रित येण्याने हे दगड निर्माण झाले आहेत. ईशान्य ब्राझीलमधील एस्पिरितो सांतो या राज्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून हे त्रिनडेड बेट 1140 किलोमीटर अंतरावर आहे.

3/7

Plastic Rocks

प्लास्टिकचे हे दगड पाहून असं दिसून येत की मानव आता थेट दगडांच्या निर्मितीवरही परिणाम करताना दिसत आहे. पर्यावरणावर मानवाने केलेला गंभीर परिणाम या दगड्यांच्या रुपाने दिसून येत आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पारानाचे जिओलॉजिस्ट फरनांडा एवलर सांटोस यांनी हे दगड धोक्याचा इशारा देणारे आहेत. आज आपल्याला प्लास्टिकपासून बनवलेले दगड दिसत असून आपण निसर्गाला किती धोका पोहचवत आहोत हे दर्शवत आहे, असं फरनांडा सांटोस म्हणाल्या.

4/7

Plastic Rocks

फरनांडा सांटोस यांनी प्लास्टिक प्रदूषण आता अगदी जमिनीच्या खालीपर्यंत पोहोचलं आहे. तपासानंतर हे दगड प्लास्टिग्लोमरेट्स आहेत असं समजलं. म्हणजेच हे दगड निर्माण होतानाच त्यांच्यामध्ये माती, रेती आणि अन्य पदार्थांबरोबरच प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

5/7

Plastic Rocks

प्लास्टिकपासून बनवलेले हे दगड मासेमारी करणाऱ्या लोकांच्या जाळ्यांमध्ये आडकून अनेकदा किनाऱ्यापर्यंत येतात. या बेटाजवळच समुद्रात ज्वालामुखी असल्याने समुद्रातील प्लास्टिक वितळून दगडांबरोबर मिसळते. दगडांबरोबरच हे प्लास्टिक इतर गोष्टींबरोबरही मिसळतं. लाव्हा रसामुळे दगड निर्माण होत असताना त्यामध्येच प्लास्टिक मिसळत असल्याने नैसर्गिक दगड आणि प्लास्टिक वेगळं करता येत नाही.

6/7

Plastic Rocks

त्रिनडेड बेट हे ग्रीन टर्टल म्हणजे हिरव्या रंगाच्या कासवांच्या प्रजातीचं संवर्धन आणि प्रजनन केंद्र आहे. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं ग्रीन टर्टल येतात आणि अंडी देतात. या बेटांवरील बहुतांशी लोक हे ब्राझीलच्या लष्कराशी संबंधित व्यक्तीच आहेत. कासवांची काळजी घेण्याचं काम हे लोक करतात.

7/7

Plastic Rocks

प्लास्टिकचे हे दगड फारच मोठ्या आकारमानाच्या प्रदेशामध्ये आढळून आल्याचं फरनांडा सांटोस यांनी सांगितलं. म्हणजेच मानवाने प्लास्टिकच्या माध्यमातून प्रदुषित केलेल्या निसर्गाचा फटका आता या बेटावरील जैवविविधतेला बसत आहे. याचे दुरोगामी परिणाम पहायला मिळतील असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.