वाऱ्यापेक्षा जास्त वेग, आलिशान थाट! कधी पाहिलीय का 200 कोटींची कार, पाहा का आहे खास

Technology : एखाद्या कारची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते...तुम्ही फार फार तर 5 कोटी किंवा 10 कोटींपर्यंत विचार कराल...पण आता आम्ही तुम्हाला एक अशी कार दाखवणार आहोत जिची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. या कारची किंमत आहे 200 कोटी...असं काय आहे या कारमध्ये, चला पाहुयात

Nov 28, 2023, 16:56 PM IST

1/8

लग्झरी कार बनवणारी प्रसिद्ध कंपनी रोल्स रॉयसनं (Rolls-Royce) जगातली सर्वात महागडी कार लॉन्च केलीय. या कारचं नाव आहे बोट टेल (Boat Tail)

2/8

या कारची किंमत आहे तब्बल 20 मिलियन पाऊंड्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 200 कोटी इतकी आहे. ही कार बनवण्यासाठी रोल्स रॉयसला तब्बल चार वर्ष लागलीयेत. 

3/8

रोल्स रॉयसची ही बोट टेल कार 19 फूट लांब असून, यातून 4 जण प्रवास करू शकतात. कंपनीनं स्वेप टेल कारला डोळ्यासमोर ठेवून ही कार तयार केलीये. 

4/8

स्वेप टेल ही रोल्स राईसची सर्वात महागडी कार होती, तिची किंमत होती 130 कोटी रूपये. मात्र आताची बोट टेल कार त्यापेक्षा खुपच ऍडवान्स आहे.

5/8

या कारच्या मागची बाजू स्पीडबोट प्रमाणे आहे. कारमध्ये 563 हॉर्स पॉवरचं V12 6.75 बाईट टर्बो इंजिन बसवण्यात आलंय. 

6/8

कारमध्ये तब्बल 15 स्पिकर्ससह सराउंड साऊंड सिस्टम बसवण्यात आलीये. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे खास पिकनिकसाठी ती बनवण्यात आलीय. 

7/8

आपली स्वताची कार असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं...अनेकांना महागड्या गाड्यांचा छंद असतो. त्यातही अशा कोट्यवधींच्या घरातील गाड्या एखादा उद्योगपती, किंवा सेलिब्रिटीजच घेऊ शकतो. 

8/8

त्यामुळे आता ही 200 कोटींची कार खरेदी करणारा मालकही जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल.