'या' खेळाडूंनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा, विराटने म्हटलं "स्त्री आणि पुरुष समान नाही तर..."

Mar 08, 2018, 20:37 PM IST
1/5

जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सर्वचजण महिलांना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये क्रिकेटर्सचाही समावेश आहे. टीम इंडियाचा माजी बॅट्समन मोहम्मद कैफने आपली पत्नी पूजासाठी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये कैफने म्हटलयं की, संपूर्ण वर्षभरात तुमचे सर्व दिवस खास आहेत. यामध्ये महिला दिनाचाही समावेश आहे.  

2/5

मोठ्या काळानंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनानेही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रैनाने आपल्या मुलीचा आणि पत्नीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.  

3/5

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर आरपी सिंह यानेही आपली पत्नी आणि मुलीचा फोटो पोस्ट केलाय. यासोबतच आरपी सिंहने म्हटलयं की, महिला या नॅचरली लीडर असतात. महिला सशक्तीकरणाची आणखीन गरज आहे.  

4/5

शिखर धवनने महिला दिनाच्या दिवशी आपली पत्नी आणि मुलीची आठवण काढत म्हटलयं की, तुम्ही प्रत्येक घरातील आनंदाचा क्षण आहात. कुठलाही आनंद तुमच्याशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या पत्नीची आठवण काढत त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

5/5

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, "स्त्री आणि पुरुष कधीच समान नसतात. खरं सांगायंच तर, घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार या सारख्या अनेक समस्या असतानाही महिला पुढे जात कर्तुत्व सिद्ध करत आहात. महिला या पुरुषांच्या बरोबर नाही तर पुरुषांपेक्षा चांगल्या आहेत."