Goodbye 2022: बुमराह नव्हे, तर 'या' खेळाडूने 2022 वर्षात सर्वाधिक विकेट घेतल्या

टीम इंडियासाठी (Team india) 2022 हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. कारण या वर्षात टीम इंडियाला आशिया कप आणि टी20 वर्ल्ड कपसारख्या स्पर्धामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान टीम इंडियाची कामगिरी जरी अपयशी ठरली असली तरी गोलंदाजांनी मात्र कमाल केली होती. दरम्यान 2022 या वर्षात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूने घेतले हे फोटो गॅलरीतून जाणून घेऊयात. 

Dec 28, 2022, 13:17 PM IST

Most Wickets For Team India In 2022 : टीम इंडियासाठी (Team india) 2022 हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. कारण या वर्षात टीम इंडियाला आशिया कप आणि टी20 वर्ल्ड कपसारख्या स्पर्धामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान टीम इंडियाची कामगिरी जरी अपयशी ठरली असली तरी गोलंदाजांनी मात्र कमाल केली होती. दरम्यान 2022 या वर्षात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूने घेतले हे फोटो गॅलरीतून जाणून घेऊयात. 

1/5

टीम इंडियाचा (Team india) अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये 33 मॅचमध्ये एकूण 37 विकेट घेतल्या होत्या.

2/5

Team India

चौथ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचे (jasprit bumrah) नाव येते. जसप्रीत बुमराहने यावर्षी 20 डावात 39 विकेट घेतल्या आहेत. 

3/5

Team India

टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद सिराजही (mohmmad siraj) या वर्षात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने 2022 मध्ये 27 डावात 41 विकेट घेतल्या होत्या.

4/5

Team India

अक्षर पटेल (axar patel) हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अक्षर पटेलने 35 डावात एकूण 42 विकेट घेतल्या आहेत.

5/5

Team India

2022 या वर्षात सर्वात यशस्वी गोलंदाज लेग स्पिनर युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) ठरलाय. युझवेंद्र चहलने यावर्षी 32 डावात 44 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे युझवेंद्र चहलने या सर्व विकेट्स फक्त वनडे आणि टी-20 मध्ये घेतल्या आहेत.