LPG Booking:बुकींगच्या अर्ध्या तासात मिळेल LPG सिलेंडर !

Jan 13, 2021, 14:10 PM IST
1/5

LPG तात्काळ सेवा सुरु होणार

LPG तात्काळ सेवा सुरु होणार

प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यामध्ये LPG तात्काळ सेवा सुरु होईल. आमच्या ग्राहकांना LPG सिलेंडर बुकिंगच्या 30 ते 45 मिनिटांच्या आत मिळेल असं IOC ने म्हटलंय.  IOC चा हा प्रयत्न `ease of living` ध्येयाचा एक भाग आहे.

2/5

1 फेब्रुवारीपासून LPG Tatkal Seva!

1 फेब्रुवारीपासून LPG Tatkal Seva!

ही सर्व्हीस आम्हाला आमच्या स्पर्धकांपासून वेगळं उभं करुन ग्राहकांचं लक्ष वेधून घेते. ही सर्व्हीस लवकर सुरु करण्याची तयारी सुरु आहे. 1 फेब्रुवारीपासून सेवा सुरु होण्याची शक्यता असल्याचे इंडीयन ऑईल कंपनीनं म्हटलंय.

3/5

सर्व्हिससाठी चार्ज

सर्व्हिससाठी चार्ज

जे ग्राहक  Tatkal LPG सेवा किंवा `single day delivery service` चा वापर करतील त्यांना कमी किंमत मोजावी लागेल. हा चार्ज किती असेल यावर सध्या चर्चा सुरुय. तात्काळ सेेवेसाठी डिलर्सच्या सध्याच्या डिलीव्हरी नेटवर्कची मदत घेतली जाईल.  

4/5

सिलेंडर डिलीव्हरी ही समस्या

सिलेंडर डिलीव्हरी ही समस्या

SBC या सिंगल बॉटल सिलेंडर ग्राहक म्हणजे ज्यांच्याकडे एकच LPG सिलेंडर आहे, त्यांना अचानक सिलेंडर संपल्यानंतर अडचण येते. ज्यांच्याकडे दोन सिलेंडर आहेत त्यांना DBC किंवा Double Bottle Consumers म्हटलं जातं. एक सिलेंडर संपल्यावर दुसऱ्या सिलेंडरचा त्यांच्याकडे पर्याय असतो. Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) वर CAG च्या रिपोर्टनुसार सिलेंडर डिलीव्हरी हे LPG समोरचे मोठे आव्हान आहे.

5/5

याआधी देखील आली होती स्कीम

याआधी देखील आली होती स्कीम

LPG डीलरच्या म्हणण्यानुसार  IOC ची ही स्कीम नवी नाहीय. जुलै 2010 मध्ये तात्कालीन पेट्रोलियन मंत्री मुरली देवरा यांनी `Preferred Time LPG Delivery Scheme आणली होती. यानुसार ग्राहक सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत सिलेंडरची मागणी करु शकतो. पण ही स्कीम कधी सुरु झाली नाही.