नखे आणि केसांमध्ये 'ही' लक्षणे दिसली तर शरीराला कॅल्शियमची गरज

केसांच्या काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण चांगले प्रोडक्ट केसांवर लावतो. असे विविध महागातले उपाय केले तरी केस पातळ होणे, केस गळणे थांबत नाही.

| Jul 04, 2023, 19:38 PM IST

केसांच्या काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण चांगले प्रोडक्ट केसांवर लावतो. असे विविध महागातले उपाय केले तरी केस पातळ होणे, केस गळणे थांबत नाही.

1/7

नखे आणि केसांमध्ये 'ही' लक्षणे दिसली तर शरीराला कॅल्शियमची गरज

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

केसांच्या काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण चांगले प्रोडक्ट केसांवर लावतो. असे विविध महागातले उपाय केले तरी केस पातळ होणे, केस गळणे थांबत नाही.

2/7

आहाराकडे लक्ष देणे आवश्यक

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

असे तुमच्यासोबतही होत असेल तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त अन्नाचा वापर कमी करत आहात का हे पाहावे लागेल.

3/7

केसांवर लक्ष द्या

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

कारण कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, केस प्रथम खूप वेगाने पातळ होतात आणि नंतर त्यांचे केस गळणे वाढते. असे असले तरीही केवळ केसांच्या या लक्षणाच्या आधारावर शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे, हे आपण ठरवू शकत नाही. 

4/7

नखेही पातळ होऊ लागतात

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

तुमच्या नखांवरही एक नजर टाका. कारण शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखेही पातळ होऊ लागतात आणि लवकर तुटू लागतात.

5/7

कॅल्शियमची आवश्यकता

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

जर तुम्हाला ही दोन्ही लक्षणे एकत्र दिसली तर तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात कॅल्शियमची पूर्तता करणे आवश्यक आहे. कारण नखे आणि केस दोन्ही चांगल्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते.

6/7

डाळी, दूध, दही आणि पनीरचा समावेश

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

केस जाड, मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात डाळी, दूध, दही आणि पनीरचा समावेश करा. कारण या सर्व गोष्टी शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्याचे काम करतात.

7/7

शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता

symptoms are seen in nails and hair if your body need calcium

जर शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता असेल तर आपल्याला कॅल्शियम आहाराचा लाभ मिळणार नाही. कारण व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे कॅल्शियम शरीरात पचू शकत नाही.