IND vs SL : हार्दिक पांड्या नाही तर मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटीचा कॅप्टन

Suryakumar Yadav emerges as T20 captain : रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा (India T20I Captain) कर्णधार कोण असणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अशातच हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. मात्र टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरच्या मनात कर्णधार म्हणून एका खास व्यक्तीचं नाव आहे.

| Jul 16, 2024, 23:39 PM IST
1/5

हार्दिक पांड्या

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार हार्दिक पांड्या वनडे सिरीजसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती समोर आलीये. खासगी कारणास्तव तो संघाचा भाग नसेल.

2/5

टी-ट्वेंटीचा उपकर्णधार

हार्दिक पांड्या हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा टी-ट्वेंटीचा उपकर्णधार होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी पांड्या उपलब्ध असेल, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

3/5

सूर्यकुमार यादव

हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करणार होता पण सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.

4/5

टी-्टवेंटी वर्ल्ड कप 2026

फक्त श्रीलंका मालिकेसाठी नाही तर बीसीसीआय सूर्यकुमारला आगामी 2026 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंत कॅप्टन्सी देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती देखील मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

5/5

मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीमध्ये हार्दिकला प्रेशरमध्ये चांगली कामगिरी करता आली नसल्याने सिलेक्टर्स पांड्याच्या नावावर असमर्थ दिसले. त्यामुळे आता सूर्यावर डाव लावण्याची शक्यता आहे.