पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हिमवर्षाव, पर्यटक लूटतायंत आनंद

Jan 05, 2021, 15:33 PM IST
1/7

काश्मीरचा हिवाळा हंगाम पर्यटकांना खूपच आवडतो. काश्मीर खोऱ्यातील हिमवृष्टी पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दूरवरुन येथे येतात. काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे येथे थंडीचा कडाका वाढला आहे. हिमवृष्टीमुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. (छायाचित्र सौजन्य: अशरफ वणी)

2/7

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरु आहे. उत्तर भारतात त्यामुळे शीतलहर आहे. शीत लहर (Cold Wave) मुळे हुडहुडी वाढली आहे. सगळीकडे बर्फच दिसत आहे. बाजारात त्यामुळे शुकशुकाट आहे.

3/7

काश्मीर खोऱ्यात सतत होणार्‍या हिमवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. याशिवाय श्रीनगर विमानतळावरील उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. काश्मीरला ये-जा करण्यात लोकांना त्रास होत आहे.

4/7

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी किमान तापमान 2 डिग्री सेल्सियस आणि कमाल 4 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. मात्र, सोमवारी येथील किमान तापमान 0 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली गेले आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये किमान तापमान 3 अंश, गुलमर्गमध्ये -4 डिग्री सेल्सियस आणि कारगिलमध्ये -4 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले.

5/7

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोऱ्यात पुढील २ दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजही श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. यावेळी, काही लोक घराबाहेर पडले आणि हिमवृष्टीचा आनंद घेतांना दिसले. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

6/7

जम्मू-काश्मीरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. किश्तवाड आणि पुंछमध्ये हिमस्खलन होण्याची शक्यता आहे.

7/7

महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये 40 दिवस हवामान कोरडे आणि थंड राहणार आहे. काश्मीरमध्ये 21 डिसेंबरपासून ते 31 जानेवारीपर्यंत थंड वातावरण राहिल.