विराटच्या मैदानावर Smriti Mandhana चं झुंजार शतक, 'या' यादीत मिळवलं मानाचं स्थान

IND W vs SA W 1st ODI: इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (Smriti Mandhana Century) एक मोठा रेकॉर्ड नावावर केलाय. 

| Jun 16, 2024, 19:19 PM IST

Smriti Mandhana Century: दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या वनडेत (INDW vs SAW) स्मृती मानधनाने शतकी खेळी केली. यावेळी तिने एक रेकॉर्डला गवासणी घातली आहे.

1/7

स्मृती मानधना

स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 व्या शतकाची देखील नोंद केली आहे.

2/7

7000 धावांचा टप्पा पार

स्मृती मानधनाने तिच्या या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला.

3/7

दुसरी भारतीय खेळाडू

अशी कामगिरी करणारी स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची दुसरी खेळाडू ठरली आहे.

4/7

मिताली राज

स्मृती मानधनाच्या आधी टीम इंडियाचा माजी कॅप्टन मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता.  

5/7

आंतरराष्ट्रीय सामने

उपकर्णधार स्मृती मानधनाने 6 कसोटी, 83 एकदिवसीय, 133 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

6/7

26 अर्धशतक

स्मृतीने 83 एकदिवसीय सामन्यात 26 अर्धशतक ठोकले आहेत. तसेच अनेक मोठ्या सामन्यात स्मृतीने एकाकी झुंज देखील केलीये.

7/7

50 ओव्हरमध्ये 265 धावा

दरम्यान, स्मृती मानधनाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 265 धावांपर्यंत मजल मारली.