गरोदरपणात हे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची चूक करु नका, होतील गंभीर परिणाम

गरोदरपणात काही ब्युटी प्रोडक्टचा वापर केल्याने बाळाला व त्याच्या आईसाठी नुकसानदायक ठरु शकते.

| Jul 19, 2023, 14:11 PM IST

Side Effect Of Beauty Products In Pregnancy: गरोदरपणात काही ब्युटी प्रोडक्टचा वापर केल्याने बाळाला व त्याच्या आईसाठी नुकसानदायक ठरु शकते.

1/5

गरोदरपणात हे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याची चूक करु नका, होतील गंभीर परिणाम

side effects of using beauty products during preganancy in marathi

Side Effect Of Beauty Products In Pregnancy: आई होण्याचा आनंदा हा काही वेगळाच असतो. प्रत्येक स्त्री तिचा गरोदरपणातील काळ एन्जॉय करत असते. तिला स्वतःसोबत गर्भातील बाळाचीही काळजी घ्यायची असते. त्यामुळं गरोदर असताना काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. महिलांना मेकअप हा अत्यंत प्रिय आहे. मात्र गरोदरपणात काही ब्युटी प्रोडक्ट्स वापरणे धोक्याचे ठरु शकते. बाळासाठी आणि स्वतःसाठी कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरणे नुकसानदायक ठरु शकते हे आपण जाणून घेऊया. 

2/5

परफ्युम

side effects of using beauty products during preganancy in marathi

गरोदरपणाच्या काळात डियोड्रंट आणि परफ्युमसारख्या वस्तूंचा वापर करणे टाळा. कारण त्यात वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा होणाऱ्या बाळावर परिणाम होतो. त्याचबरोबर महिलांना स्कीन अॅलर्जी आणि खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. 

3/5

लिपस्टिक

side effects of using beauty products during preganancy in marathi

प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी लिपस्टिक वापरणे टाळावे. कारण यात असलेले लेड काही वेळानंतर तुमच्या शरीरात जाते. त्यामुळं तुमच्या बाळावर त्याचा चुकीचा परिणाम होउ शकतो. 

4/5

हेअर रिमूव्हर क्रीम

side effects of using beauty products during preganancy in marathi

महिलांनी गरोदरपणात हेअर रिमूव्हर क्रीम वापरणे टाळावे.  गर्भधारणेदरम्यान शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, जेव्हा केमिकलयुक्त केस काढून टाकणारी क्रीम वापरली जाते तेव्हा त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. 

5/5

हेअर डाय

side effects of using beauty products during preganancy in marathi

महिला अनेकदा पांढरे केस लपवण्यासाठी हेअर डाय वापरतात. पण गरोदरपणात केसांना कलर करणे टाळावे. कारण त्यात असलेल्या अमोनिया त्वचेसाठी हानिकारक असू शकतो.