Shubman Gill : शतक पूर्ण करायचं होतं पण...; सेंच्युरी हुकल्यानंतर गिलने कोणाला धरलं जबाबदार?

गुजरातने लखनऊवर आज दणदणीत विजय मिळवला. यावेळी गुजरातचा ओपनर शुभमन गिलने क्लास दाखवत नाबाद 94 रन्स केले. मात्र, त्याचं शतक 6 रन्सनी हुकलं.  

May 07, 2023, 22:26 PM IST
1/5

गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स या सामन्यात शुभमम गिलने तुफान फलंदाजी केली.

2/5

लखनऊविरूद्धच्या सामन्यात शुभमनने 51 बॉल्समध्ये 94 रन्सची खेळी केली.

3/5

मात्र अवघ्या 6 रन्सने शुभमनचं शतक हुकलं. मात्र त्याला शतक पूर्ण करायचं होतं, असं गिलने म्हटलंय.

4/5

फलंदाजी झाल्यानंतर शुभमन गिल म्हणाला, शेवटच्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण करायचं माझ्या मनात होतं. चौथ्या बॉलपर्यंत मला फोर मारता आली नाही

5/5

पण आमच्याकडे अजून पाच खेळ आहेत आणि मला संधी मिळेल, असंही शुभमन म्हणाला. त्यामुळे शतक पूर्ण न होण्यामागे त्याने स्वतःलाच जबाबदार धरल्याचं त्याच्या बोलण्यावरून समजतंय.