PHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. 

Mar 03, 2024, 10:11 AM IST
1/8

बबली स्टाइलसाठी ओळख असलेली ही अभिनेत्रीचे आई वडील हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. तिच्या महाराष्ट्रीयन लूकमुळे चाहते नेहमी घायाळ होतात. 

2/8

सरळ, साधी आणि गोंडस अशी आशिकी गर्ल श्रद्धा कपूर हिचा आज वाढदिवस आहे. मुंबईत अभिनेता शक्ती कपूर तर आई शिवांगी कोल्हापुरी आहे. 

3/8

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूरला चित्रपटात काम करायचं नव्हतं. तर मीडिया रिपोर्टनुसार ती 16 वर्षांची असताना तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण तिने ती ऑफर नाकारली होती.   

4/8

एवढंच नाही तर तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी श्रद्धा बोस्टनमध्ये कॉफी शॉपमध्ये काम करत होती. तिने ही नोकरी पॉकेटमनीसाठी केली होती. 

5/8

श्रद्धाने 2010 मध्ये तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पण तिची खरी ओळख मिळाली ती 2013 मध्ये रिलीज झालेल्या आशिकी 2 या चित्रपटातून. यानंतर श्रद्धा 'एक व्हिलन', 'हैदर', 'हसीना पारकर', 'एबीसीडी २', 'बागी', ​​'स्त्री' आणि 'छिछोरे' मधून झळकली. 

6/8

अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार तिची एकून संपत्ती 57 कोटी रुपये इतकी आहे. ती एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रुपये मानधन घेते. शिवाय जुहूमध्ये करोडोंचं आलिशान घर आहे. शिवाय महागड्या गाड्यांचाही तिला शौक आहेत.

7/8

अभिनेत्रीने लॅम्बोर्गिनी हुराकन टेकनिका खरेदी केलीय. ज्याची किंमत 4 कोटी रुपये आहेत. याशिवाय त्याच्याकडे 80 लाख रुपयांची Audi Q7, 2 कोटी रुपयांची BMW 7 आणि 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीची Mercedes-Benz GLE सारख्या कार तिच्या दारात आहे. 

8/8

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये श्रद्धा राहुल मोदीसोबत दिसली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही तरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.