'विरोध करायचाच असेल तर...', विमानतळावर कंगनाला कानशिलात लगावण्या प्रकरणावर शेखर सुमन यांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणानंतर सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा सुरु आहे. कंगनाला CISF महिला जवाननं कानशिलात लगावल्यानंतर सगळीकडून या प्रकरणात लोक त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काही लोकं तिच्या समर्थनाथ बोलत आहेत तर काही तिच्या विरोधात. अशात आता काही दिवसापूर्वीच भाजपात प्रवेश केलेल्या अभिनेता शेखर सुमन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

| Jun 08, 2024, 14:05 PM IST
1/7

शेखर आणि अध्ययन

शेखर सुमन आणि त्यांचा मुलहा अध्ययन सुमननं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शेखर यांनी कंगनासोबत घडलेल्या घटनेविषयी प्रश्न विचारला. 

2/7

कंगनाविषयी विचारला प्रश्न

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावेळी शेखर यांना विचारण्यात आलं की नुकतीच एक घटना घडली की कंगनाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला, त्यावर तुमचं काय मत आहे. 

3/7

शेखर सुमन यांची प्रतिक्रिया

'हे कोणाबाबतही झाले असले तरी हे पूर्णपणे चुकीचं आहे. कंगना आता मंडीतून खासदार झाली आहे. कोणाचा विरोध करायचाच असेल तर सभ्य पद्धत वापरली पाहिजे. अशा प्रकारची कृती अस्वीकार्य आहे.' 

4/7

शेखर सुमन

शेखर सुमन पुढे म्हणाले की "वैयक्तिकरित्या कोणाची कितीही समस्या असली तरी ती सार्वजनिकपणे अशा पद्धीतनं मांडणे योग्य नाही. अशी घटना पुन्हा  होऊ नये." 

5/7

अध्ययला वडिलांचे विचार पटले!

याबाबत अध्ययनला विचारले असता तो सुद्धा त्याच्या वडिलांशी पूर्णपणे सहमत असल्याचे दिसला.

6/7

महिलेनं का लगावली कानशिलात!

कंगनाच्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानं संतप्त होती CISF महिला जवान. त्यामुळे कंगनाला पाहता थेट लगावली कानशिलात. 

7/7

कंगनानं स्वत: केला खुलासा

कंगनानं या घटनेनंतर स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. इतकंच नाही तर तिनं ही संपूर्ण घटना देखील सांगितली होती.